28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeउद्योग*इकोफायचा मोंट्रा इलेक्ट्रिकसोबत सहयोग*

*इकोफायचा मोंट्रा इलेक्ट्रिकसोबत सहयोग*

◆ कार्गो व पॅसेंजर वाहनांसाठी आर्थिक साह्य प्रदान करणार ◆

मुंबई, १७ ऑक्‍टोबर २०२३: इकोफाय ही भारतीय रिटेल क्षेत्रातील क्‍लायमेट फायनान्सिंग पोकळी भरून काढण्‍याप्रती समर्पित भारतातील ग्रीन-ओन्‍ली एनबीएफसी आणि मोंट्रा इलेक्ट्रिक हा १२३ वर्षांचा वारसा असलेल्‍या मुरूगप्‍पा ग्रुपचा ईव्‍ही ब्रॅण्‍ड यांनी कार्गो व पॅसेंजर इलेक्ट्रिक तीन-चाकींसाठी वित्तपुरवठा सोल्‍यूशन्‍स उपलब्‍ध करून देण्‍याकरिता सहयोग केला आहे.

इकोफाय कार्गो व पॅसेंजर वाहनांसाठी आर्थिक साह्य प्रदान करेल, तर मोंट्रा इलेक्ट्रिक पुढील वर्षामध्‍ये जवळपास १०,००० इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करण्‍यास सज्‍ज आहे. इकोफायचा या बाजारपेठेचा अधिकाधिक हिस्‍सा संपादित करण्‍याचा मनसुबा आहे. हा सहयोग भारतातील परिवहन क्षेत्रासाठी अधिक शुद्ध व अधिक शाश्‍वत भविष्‍य निर्माण करण्‍याच्‍या दिशेने महत्त्वाचा टप्‍पा आहे.

इकोफायच्‍या सह-संस्‍थापक, व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजश्री नाम्बियार म्‍हणाल्‍या, “इकोफायचा व्‍यक्‍तींना व लघु व्‍यवसायांना पर्यावरणाप्रती जागरूक निवड करण्‍यामध्‍ये आर्थिक साह्य प्रदान करत भावी शाश्‍वत, नेट-झीरो उत्‍सर्जनाला चालना देण्‍यामध्‍ये महत्त्‍वाची भूमिका बजावण्‍याचा उद्देश आहे. मोंट्रा इलेक्ट्रिकसोबत या धोरणात्‍मक सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमचा सर्वोत्तम उत्‍पादने व एकसंधी अनुभव देण्‍याचा मनसुबा आहे, जे हरित भविष्‍य निर्माण करण्‍याप्रती समर्पित असलेल्‍या ग्राहकांच्‍या विशिष्‍ट गरजांशी संलग्‍न आहेत.”

भारतातील इलेक्ट्रिक तीनचाकी बाजारपेठेत मोठा विकास दिसून येत आहे, जेथे ईव्‍ही पॅसेंजर वेईकल्‍समध्‍ये वार्षिक ५८ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे, तर ईव्‍ही कार्गो वेईकल्‍समध्‍ये वार्षिक ११४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. इकोफाय व मोंट्रा इलेक्ट्रिकमधील हा सहयोग व्‍यक्‍तींना व व्‍यवसायांना परिवहनाचे स्‍वच्‍छ व शाश्‍वत मोडचा अवलंब करण्‍यास सक्षम करण्‍यास सज्‍ज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]