इंद्रधनु आणि त्यांचे सेवाकार्य

0
227

इंद्रधनूने वृद्धांच्या जीवनात सप्तरंग फुलवले..

………………………………………….

डॉ. पतंगे.. उमरगा..इंद्रधनु अन् त्यांचे सेवाकार्य.

यासंदर्भात ऐकलं होतं.. पण आज प्रत्यक्ष पाहिलं…

जसं आणि जेवढं ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पाहिलं आणि अनुभवायला मिळालं.

खूपच ग्रेट! आदर्श आणि प्रेरणादायी.!

गुंजोटी( उमरगा )शिक्षणाच्या प्रसाराचं आणि अनेक चळवळींच निजाम काळापासून प्रसिद्ध गाव. या गावाने देव..देश.. अन् धर्मासाठी अनेक रत्ने दिलेली आहेत. त्याच मालिकेतील डॉ.दामोदर पतंगे हे एक महारत्न. जुन्या काळातील नामांकित सिव्हिल सर्जन,नावाजलेल्या श्रीकृष्ण शिक्षण संस्था गुंजोटीचे सेक्रेटरी, लायन्स क्लब , इंडियन मेडिकल असोसिएशन ई.च्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्य.

30 सप्टेंबर 1993 च्या भूकंपानंतर सर्व घटकांचं पुनर्वसन झालं पण वृद्धांच्या पुनर्वसनाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. या समस्येकडे डॉक्टरांचं लक्ष वेधल गेलं..या वेदनेने डॉक्टर तळमळले आणि ठरवलं की या वृद्धांच्या आयुष्यात पडलेला अंधार दूर करून त्यांच्या जीवनात पुन्हा आनंदाचा..चैतन्याचा प्रकाश निर्माण करायचा आणि तोही सप्तरंगी इंद्रधनु..दिन दुबळ्यांचा कैवारी होऊन त्यांना आपल्या कवेत घ्यायचं आणि आपणच त्यांचा आधार बनायचं… अन् याच प्रेरणेतून सुरू झाले ते इंद्रधनू वृध्द सेवा केंद्र.

शहरी वर्दळीपासून दूर…,निसर्गरम्य आणि…. वृक्ष वल्लींनी नटलेला परिसर. अतिशय देखणी…हवेशीर… पारंपारिक संस्कृती जपत… विलक्षण कल्पकतेने बांधलेली इमारत.इमारतीचा प्रत्येक भाग बोध प्राय.इथले सर्व ट्रस्टी आणि कर्मचारी ध्येयवृत्ती..सेवाभावी..प्रेमळ आणि सौजन्यशील आहेत. प्रा.अभयकुमार हिरास सर सामाजिक बांधिलकी जपत इथे कार्यतत्पर असतात. श्री खमितकर सर व इतरांची साथही मोलाची आहे.

इंद्रधनू पाहण्यासाठी सोबत विवेकानंद हॉस्पिटल, लातूरचे प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. महेश देवधर (अध्यक्ष,मातोश्री वृद्धाश्रम, लातूर), वयस्क सहजीवन मंडळाचे डॉ.मधुकरराव गिरी(माजी शिक्षणाधिकारी),श्री शामसुंदर मानधना(member of Railway board) उमरग्याचे मित्र श्री संतोष कुलकर्णी हे होते.

इंद्रधनू म्हणजे निराधार व उपेक्षित वृध्दांना दया बुध्दीने पोसण्याच ठिकाण नसून अशा वडीलधाऱ्या माणसांना त्यांचा वृद्धापकाळ सन्मानानं… समाधानानं…आणि आनंदाने जगण्याचं ठिकाण.

अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः । 

         चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्धर्मो यशो बलम् ll

 प्रा. गंगाधर खेडकर

           कार्यवाह                                                  मातोश्रीवृद्धाश्रम,लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here