लातूर ;( माध्यम वृत्तसेवा)-
इंदिरा महिला नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अॅड सौ सविता ओमप्रकाश मोतीपवळे व उपाध्यक्षपदी सौ कौशल्यादेवी सत्यनारायणजी लड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली
इंदिरा महिला नागरी सहकारी बँकेची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी सहकार विभाग निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्य्क निबंधक अशोक कदम यांनी निवडणूक प्रकिया राबवली. त्यांना श्री शेख नबी सहकार अधिकारी श्रेणी २ यांनी सहाय्य केले.
नूतन संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी श्री अशोक कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्ष अॅड सौ सविता ओमप्रकाश मोतीपवळे व उपाध्यक्ष सौ कौशल्यादेवी सत्यनारायणजी लड्डा यांची निवड करण्यात आली.
संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये श्रीमती अलका रामगोपाल सारडा, सौ शांताबाई आण्णासाहेब पाटील, अॅड सविता मोतीपवळे, सौ विजया सावळे, सौ शकुंतला पालापुरे, श्रीमती विभावरी कस्तुरे, सौ अरुणा गुणगुणे, श्रीमती सुमन गंभीर, सौ आशा राजेंद्र गीरी, सौ सरस्वती मळभागे, सौ संगीता मन्मथ पंचाक्षरी, श्रीमती मंगल मधुकर पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली