निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यात राज्यात सर्वप्रथम पहिली ते चौथी या दरम्यानचालत जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून सेमी इंग्लिशचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाची पुस्तके विशेष मागणी करुन मागविण्यात आली आहेत. या पुस्तकाचे शालेयस्तरावर वाटप माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात कन्या प्रशाला निलंगा येथे आज करण्यात आले.
यावेळी गटविकासधिकारी अमोलजी ताकभाते, गटशिक्षणाधिकारी सुरेशजी गायकवाड, विस्तार अधिकारी संतोषजी स्वामी, खादीग्रामोद्योगचे चेअरमन दगडुजी सोंळूके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शषेरावजी मंमाले, माजी उपनगराध्यक्ष मनोजजी कोळ्ळे, जि.प. चे माजी स्थायी समितीचे सदस्य अरुणजी सोंळूके, संजयजी कदम यांच्यासह केंद्रप्रमूख व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आ. निलंगेकर बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी इग्रंजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ही गरज लक्ष्यात घेऊन आपल्या भागातील विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याउद्देशाने पहिलीचे चौथी या वर्गासाठी सेमी इंग्लिशचे वर्ग सुरु करावेत आशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या होत्या. आज पालकांचा व विद्यार्थ्यांचा इग्रंजीमुळे खाजगी शाळेकडे औढ वाढली आहे . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना खाजगी शाळेतील शिक्षण घेणे ठकीण जाते. यामुळेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्लिश माध्यमातून शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या सुचनेनुसार राज्यात सर्वप्रथम निलंगा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून पहिलीचे चौथी दरम्यान सेमी इंग्लिशचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.या शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना सध्याच्या स्पर्धेच्या युगात जागतिक पातळीवर टिकून राहण्यासाठी सक्षम बनतील असा विश्वास व्यक्त केला. याव्दारे शिक्षणाचा नविन लातूर पॅटर्न लौकिक मिळवेल असा विश्वास आहे.