आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची दूरदृष्टी

0
184
निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ तहसील कार्यालयात सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या दुरदृष्टीतून विद्युत देयकाची बचत
निलंगा/प्रतिनिधी ः- अपारंपारीक उर्जा विकास माध्यमातून सौरउर्जा प्रकल्प कार्यरत करण्यासाठी केंद्र व राज्यशासन प्रोत्साहन देत आहे. त्या अनुषंगानेच आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयात सौरउर्जा प्रकल्प उभारला जावा याकरीता प्रस्ताव दाखल केलेला होता. सदर प्रस्ताव मंजूर झालेला असून लवकरच या तिन्ही तहसील कार्यालयात सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. आ. निलंगेकर यांच्या दुरदृष्टीतून विद्युत देयकाची बचत होऊन शासकीय रक्कमेचीही बचत होण्यास मोठी मदत होणार आहे.
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सुचनेतून व त्यांनी मांडलेल्या प्रस्तावातून जिल्हा वार्षिक योजनेमध्ये अपारंपारीक उर्जा विकास या माध्यमातून सौरउर्जा प्रकल्प उभारण्याकरीता 2 कोटी 46 लाख 28 हजार रुपयांची अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आलेली आहे. या निधीच्या माध्यमातून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ या तालुक्याच्या ठिकाणी असणार्‍या तहसील कार्यालयात सौरउर्जा प्रकल्प उभारला जावा यासाठी आवश्यक असणारा निधी मंजूर करावा असा प्रस्ताव दाखल केलेला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळालेली असून या तिन्ही ठिकाणी सौरउर्जा प्रकल्प उभारण्याकरीता 13 लक्ष 98 हजार रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. सदर निधी मंजूर झाल्याने लवकरच या तिन्ही तहसील कार्यालयात सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. सदर सौरउर्जा प्रकल्प 10 किलोवॅट क्षमतेचे असणार आहेत.
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्याकाळात जिल्ह्यात सौरउर्जा प्रकल्प उभारले जावेत याकरीता सातत्याने पुढाकार घेतलेला होता. यासाठी आवश्यक असणारा निधीही शासनाकडून खेचून आणलेला आहे. सौरउर्जा प्रकल्प शासकीय कार्यालयातही कार्यान्वित व्हावेत यासाठी आ. निलंगेकरांनी विशेष सुचना केलेल्या होत्या. यामुळे शासकीय कार्यालयांना येणार्‍या विद्युत देयकांच्या रक्कमेमध्ये बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर  आगामी काळात या कार्यालयांना विद्युत देयक येण्याची शक्यता नसल्याने शासकीय रक्कमेचीही बचत होणार आहे. त्यामुळेच आ. निलंगेकर यांच्या दुरदृष्टीतून निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयात  सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्याचबरोबर आ. निलंगेकर यांनी या तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी असणार्‍या पंचायत समितीच्या कार्यालयातही सौरउर्जा प्रकल्प उभारण्याकरीता निधी प्राप्त होण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला असून सदर प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन या तिन्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये सौरउर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
चौकट
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सौरउर्जा प्रकल्प व पाणीपुरवठा यंत्रणेवर सौरपंप बसविले जावेत याकरीता विशेष सुचना केलेल्या होत्या. त्याचबरोबर अपारंपारीक उर्जा विकासच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेमध्ये याकरीता निधीची तरतुद करावी अशी सुचना केलेली होती. त्याच सुचनेनुसार निधीची तरतुद करण्यात आलेली असून या निधीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये सौरउर्जा प्रकल्प व जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेवर सोलारपंप बसविले जावेत याकरीता गत वर्षभरापासून पाठपुरावा सुरु आहे. आ. निलंगेकर यांच्या दूरदृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत देयकात बचत होऊन ही बचत झालेली रक्कम विकास कामांवर खर्च करता येणार आहे.
– संजय दोरवे, जि.प. सदस्य लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here