आ. रमेश कराड यांच्या हस्ते जलपूजन

0
192

आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍याहस्‍ते रेणा प्रकल्‍पात जलपूजन

ऊस, सोयाबीन नुकसानीची पाहणी, शेतकाऱ्यांना दिलासा

लातूर दि. ०९– दिर्घकाळ विश्रांतीनंतर झालेल्‍या दमदार पावसाने रेणा मध्‍यम प्रकल्‍प पुर्ण क्षमतेने शंभर टक्‍के भरला असून या प्रकल्‍पात भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या शुभहस्‍ते गुरूवारी जलपूजन करण्‍यात आले. त्‍याचबरोबर पावसाने नुकसानीत आलेल्‍या ऊस, सोयाबीन पिकाची पाहणी केली. रेणा नदिकाठच्‍या नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

रेणापूर, पानगाव खरोळासह रेणापूर तालुक्‍यातील बहुतांशी गावांना त्‍याचबरोबर अंबाजोगाई तालुक्‍यातील अनेक गावांना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करणाऱ्या भंडारवाडी येथील रेणा मध्‍यम प्रकल्‍प गेल्‍या शनिवार रविवार रोजी झालेल्‍या दमदार पावसामुळे तब्‍बल चार-पाच वर्षानंतर पुर्ण क्षमतेने शंभर टक्‍के भरला असून यामुळे अनेक गावच्‍या पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न सुटला आहे तर रेणा मध्‍यम प्रकल्‍पावर आधारीत असलेल्‍या शेतीला भविष्‍यात पाणी मिळणार असल्‍याने शेतकऱ्यात मोठे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेणापूर तालुक्‍यात वरदान ठरलेल्‍या रेणा मध्‍यम प्रकल्‍प पुर्ण क्षमतेने चार-पाच वर्षानंतर भरल्‍याने भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या शुभहस्‍ते विधीवत पुजन करून दि. ०९ सप्‍टेंबर २०२१ रोजी सकाळी रेणा मध्‍यम प्रकल्‍पावर जलपुजन करण्‍यात आले. यावेळी मध्‍यम प्रकल्‍पाचे उपविभागीय अभियंता विजय हिबार, शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, राजकुमार तिलमदार, एम.जी. डुब्‍बे आदिंनी आ. कराड यांचे पुष्‍पगुच्‍छ देवून स्‍वागत केले.

दिर्घकाळाच्‍या विश्रांतीनंतर झालेल्‍या पावसाने शेतकऱ्याच्‍या पिकांना दिलासा मिळाला असून काही भागात ऊस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसानही झाले आहे. बिटरगाव येथील सरस्‍वती सदाशिव गुरव यांच्‍या शेतात जावून आ. रमेशअप्‍पा कराड यांनी पावसामुळे आडवे पडलेल्‍या ऊस पिकाची प्रत्‍यक्ष पाहणी केली. रेणा मध्‍यम प्रकल्‍प पुर्ण क्षमतेने भरल्‍यामुळे प्रकल्‍पाचे सहाही दरवाज उघडून प्रकल्‍पातील पाणी नदी पात्रात सोडण्‍यात आले. अचानकपणे रेणा नदीला पुर आल्‍याने नदीकाठच्‍या  सोयाबीनसह खरीपाच्‍या पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी आ. कराड यांनी रेणापूर ये‍थे केली.

रेणा नदीवर पाहणी करण्‍यासाठी आ. रमेशअप्‍पा कराड हे आले असता रेणा नदीकाठच्‍या  नुकसानग्रस्‍त अनेक शेतकऱ्यांनी त्‍यांची भेट घेवून नुकसानीची माहिती दिली. सदरील नुकसानीची विमा कंपनीला ऑनलाईन माहिती देण्‍यासाठी अॅप चालत नाही. भोळया भाबडया शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती भरता येत नाही. संबंधीत अधिकारी कर्मचारी दखल घेत नाहीत अशा अनेक तक्रारी मांडल्‍या असता आ. रमेशअप्‍पा कराड यांनी तहसिलदार पाटील आणि तालुका कृषी अधिकारी नागरगोजे यांना याबाबत गांर्भियाने दखल घेवून शेतकऱ्यांना मदत करण्‍याच्‍या आणि नुकसानग्रस्‍त शेतीचे तात्‍काळ पंचनामे करावे अशा सुचना सर्व शेतकऱ्यासमोर दिल्‍या.

नुकसानीची माहिती ऑनलाईन विमा कंपनीला देता येत नसल्‍याने विमा कंपनीचे संबंधीत तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्याच्‍या नुकसानीचे लेखी अर्ज स्वीकारत आहेत. तेव्‍हा शेतकऱ्यांनी आपल्‍या नुकसानग्रस्‍त पिकाची माहिती अर्जाद्वारे विमा कंपनीच्‍या संबंधीताकडे तात्‍काळ द्यावी. विमा कंपनीच्‍या वतीने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्‍यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्‍न करून अशी ग्‍वाही यावेळी आ. रमेशअप्‍पा कराड यांनी दिली.

यावेळी आ. कराड यांच्‍यासमवेत भाजपाचे अनिल भिसे, डॉ. बाबासाहेब घुले, दशरथ सरवदे, सतिष आंबेकर, वसंतराव दहिफळे, पस सभापती रमेश सोनवणे, उपसभापती अनंत चव्‍हाण, रेणापूरच्‍या नगराध्‍यक्षा आरती राठोड, उपनगराध्‍यक्ष अभिषेक आकनगिरे, शरद दरेकर, वसंत करमुडे, श्रीकृष्‍ण पवार, दत्‍ता सरवदे, उज्‍वल कांबळे, श्रीकृष्‍ण मोटेगावकर, गोपाळ शेंडगे, मुन्‍ना गुरले, रामभाऊ बडे, शिवाजी उपाडे, श्रीकांत सुर्यवंशी, महेश गाडे, महेंद्र गोडभरले, अभिजीत मद्दे, राजू आलापुरे, रमा फुलारी, धनंजय म्‍हेत्रे, मारूती गालफाडे, सतिष कुलकर्णी, भास्‍कर दहिफळे, रामराव दहिफळे, आबासाहेब चव्‍हाण, श्रीकृष्‍ण जाधव, भूषण संपते, रमेश चव्‍हाण, शालिक गोडभरले, आजिम शेख, अच्‍युत कातळे, संगमेश्‍वर तत्‍तापुरे, राजू अत्‍तार यांच्‍यासह अनेकजण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here