पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाजपचे आमदार तथा युवा नेते आमदार रमेश कराड यांनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव माजी ग्रामविकास मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांची बुधवारी रात्री परळी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन जन्मदिवसा निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी . पंकजाताई मुंडे यांच्या समवेत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी भाजपा किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस त्र्यंबकआबा गुट्टे, अशोककाका केंद्रे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, ओबीसी आघाडीचे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ बाबासाहेब घुले, जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे भाजपाचे प्रा. विजय क्षिरसागर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल भिसे, सतीश आंबेकर भागवत सोट, वसंत करमुडे, दिलीप धोत्रे, जिल्हा चिटणीस प्रमोद मुदाळे, संपत कराड, नगरसेवक विजय चव्हाण, ज्ञानदेव तांदळे, रमाकांत चव्हाण संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.