आ. रमेश अप्पा कराड यांचे प्रतिपादन

0
183

*मांजरा कारखान्‍यावर स्‍व. तात्‍यांचे स्‍मारक तर होणारच; एफआरपी प्रमाणे रक्‍कम मिळवून घेणार-चिखुर्डा येथील शेतकर्‍यांच्‍या बैठकीत आ. रमेशअप्‍पा कराड यांचे प्रतिपादन*

लातूर -मांजरा कारखान्‍याच्‍या उभारणीत योगदान देणारे संस्‍थापक चेअरमन स्‍व. बब्रुवानजी काळे तात्‍या यांनी शेतकर्‍यांना आर्थिक स्‍थैर्य दिले, स्‍वाभिमान दिला त्‍यांचे स्‍मारक मांजरा कारखान्‍यावर होणारच ही शेतकर्‍यांची अस्‍मिता आहे असे सांगून मांजरा परीवाराने गाळप केलेल्‍या ऊसाला शंभर रूपयाचा हफ्ता देवून उपकार केले नाहीत आम्‍ही भिक नव्‍हे हक्‍क मागतोय. एफआरपी प्रमाणे ऊस बिलाच्‍या फरकाची रक्‍कम दसर्‍यापर्यंत शेतकर्‍यांच्‍या खात्‍यावर जमा करावी अन्‍यथा तीव्र संघर्ष करू. जोपर्यंत हक्‍क मिळणार नाही तोपर्यंत स्‍वस्‍थ बसणार नाही असे भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी बोलून दाखविले.


मांजरा परिवारातील साखर कारखान्‍यांनी एफआरपी प्रमाणे गाळप केलेल्‍या ऊसाची बिले द्यावीत अशी मागणी असताना केवळ शंभर रूपयाचा हफ्ता देवून शेतकर्‍याच्‍या कष्‍टाची हक्‍काची अवहेलना केली. याबाबत विचार विनिमय करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्‍यसाठी मांजरा कारखान्‍याचे संस्‍थापक चेअरमन स्‍व. बब्रुवानजी काळे तात्‍या यांच्‍या चिखुर्डा या जन्‍मगावी शेतकरी सभासद ऊस उत्‍पादकाची बैठक आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रमुख उपस्थितीत बुधवारी झाली. तत्‍पुर्वी स्‍व. तात्‍याच्‍या समाधीवर पुष्‍पांजली अर्पण करून त्‍यांना अभिवादन करण्‍यात आले. या प्रसंगी प्रदिपपाटीलखंडापुरकर, विक्रमकाका शिंदे, अमोल पाटील, भागवत सोट, राजेश कराड, रोहन काळे, बन्‍सी भिसे, डॉ. बाबासाहेब घुले, अनिल भिसे, हनुमंतबापू नागटिळक, तात्‍याराव बेद्रे, विजय क्षिरसागर, गोविंद नरहरे, दशरथ सरवदे, विजय काळे, दिलीप धोत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, कारखान्‍याचे शेतकरी, सभासद मालक असतानाही तशी वागणूक आजपर्यंत मिळालेली नाही. विश्‍वस्‍तच मालक बनले, मांजरा परिवारातील मांजरा, विकास आणि रेणा कारखान्‍याकडून शंभर रूपये दिले असले तरी आणखी चारशे ते पाचशे रूपये प्रतिटन एफआरपी प्रमाणे शेतकर्‍यांचे आजही येणे आहे. शेतकर्‍यांना नागव करण्‍याचे काम करणार असाल तर आम्‍हीही तुम्‍हाला नागव केल्‍याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही त्‍यांनी दिला.


मांजराच्‍या उभारणीत स्‍व. विलासरावजी बरोबरच स्‍व. बब्रुवानजी काळे तात्‍याचे योगदान आहे. त्‍यांनी कारखान्‍याला वैभव प्राप्‍त करून दिले. शेतकर्‍यांना आर्थिक स्‍थैर्याबरोबरच स्‍वाभिमान दिला. आज दोन्‍ही नेते नाहीत. स्‍व. विलासरावजींचे अत्‍यंत देखणे स्‍मारक उभे राहीले याचा आनंदच आहे. मात्र त्‍यांच्‍याच बाजूला तात्‍यांचेही स्‍मारक उभे राहिले पाहीजे ही या भागातील शेतकर्‍यांची अस्मिता आहे असे सांगून आ. कराड म्‍हणाले की, मांजरा कारखान्‍यावर तात्‍याचे स्‍मारक तर होणारच यात शंका नाही तेव्‍हा कारखान्‍याच्‍या विश्‍वस्‍तांनी विलासरावजींच्‍या  बाजूला तात्‍याच्‍या स्‍मारकाचे दसर्‍यादिवशी भुमिपूजन करावे जर तुमच्‍याने होत नसेल तर आम्‍ही शेतकर्‍यांच्‍या  वर्गणीतून स्‍मारक उभे करू.
मांजरा परिवारातील साखर कारखाने गाळप सुरू झाल्‍यापासून यंत्रणा वापरून गेटकेनचा ऊस मोठया प्रमाणात आणतात. यामुळे ८ ते १० टन एकरी उत्‍पादन कमी होते. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस ३ ते ४ महिन्‍यांनी उशीरा जातो. येत्‍या गळीप हंगामापासून मांजरा परिवारातील साखर कारखान्‍यांनी जोपर्यंत कार्यक्षेत्रातील ऊस संपत नाही तोपर्यंत गेटकेनचा ऊस आणू नये. जर आणण्‍याचा प्रयत्‍न केला तर ऊस वाहतुकीची वाहणे अडवून तीव्र संघर्ष केला जाईल असा इशारा देवून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, तात्‍यामुळेच देशमुखांना वैभव मिळाले. यापुढील काळात तात्‍याच्‍या सहकार्‍यांना अथवा माझ्या कार्यकर्त्‍यांना दाबदडपशाही करण्‍याचा प्रयत्‍न केला तर जशास तसे चोख उत्‍तर दिले जाईल. लातूर ग्रामीण मतदार संघ आपण आई मानतो. या आईलाच गेल्‍या निवडणूकीत विकत घेण्‍याचे पाप देशमुखांनी केले. येणार्‍या विधानसभा निवडणूकीत या मस्‍तवाल देशमुखांची पन्‍नास हजाराहून अधिक मतांनी पाट लावून नशा उतरविल्‍याशिवाय राहणार नाही असेही आ. कराड यांनी बोलून दाखविले.
या बैठकीत प्रदिप पाटील खंडापूरकर, विक्रमकाका शिंदे, भागवत सोट यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करून शेतकर्‍यांच्‍या पिळवणूकीतून मुक्‍त करण्‍यासाठी मांजराच्‍या इतिहासत रमेशअप्‍पा कराड यांनी पहिल्‍यांदा आवाज उठविला असल्‍याचे सांगितले. शेवटी योगिराज साखरे यांनी आभार मानले.
यावेळी भैरवनाथ पिसाळ, अनंत कणसे, विनायक मगर, गोपाळ पाटील, वैभव सापसोड, समाधान कदम, काशिनाथ ढगे, शाम वाघमारे, शरद दरेकर, विश्‍वास कावळे, सुधाकर कराड, शंकर चव्‍हाण, अच्‍युत भोसले, विजय चव्‍हाण, बापूराव बिडवे, विश्‍वास कावळे, धनराज शिंदे, वैजनाथ लवटे, संतोष जगताप, दत्‍ता सरवदे, राजकुमार आलापुरे, बाबा भिसे, सुरेखा पुरी, सुनिता माडजे, रशिद पठाण, अरूण लांडगे, गोविंद राजे, बापुराव गवळी, पुंडलिक बेंबडे, सुधाकर शिंदे, हेमंत जाधव, नाना काळे, संतोष चव्‍हाण, गोपाळ पवार, किशन क्षिरसागर, सुरेश सुर्यवंशी, शिवाजी घाडगे, सुधाकर कुंभार, विश्‍वास कदम, श्रीकृष्‍ण हुडे, चंद्रकांत घाडगे, आप्‍पाराव हुडे  यांच्‍यासह शेतकरी, ऊस उत्‍पादक कार्यकर्ते मोठया संख्‍येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here