लातूर ( प्रतिनिधी) — लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रातील टाका तालुका औसा येथील भूमिपुत्र आकाश देशमुख यांनी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले या यशाबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी शाल पुष्पगुच्छ आणि पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले.
आकाश देशमुख यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कुस्तीच्या तालीमीत सतत सराव करीत थेट महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आणि पुणे येथे झालेल्या ७४ किलो वजन गटातून रौप्य पदक मिळविले. आकाश देशमुख यांच्या या अभिमानास्पद कामगिरी बद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून कौतुक केले यावेळी भाजपाचे दीपक वांगस्कर आणि पत्रकार रामेश्वर बद्दर यांच्यासह अनेक जण होते.