भाजपा कार्यकर्त्यांनो, विचलित होऊ नका आपली नेतृत्वाला काळजी आहे – आ. दरेकर
लातूर दि.०६ – महाराष्ट्र राज्यात राजकारणाच्या अनेक घडामोडी घडत आहेत या सर्व घडामोडीचा उलगडा झाल्यानंतर कोणाच्याही मनात कसलीही शंका राहणार नाही तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये आपली पक्ष नेतृत्वाला आणि पक्षाला काळजी आहे असा विश्वास महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी दिला.
विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते आमदार प्रवीणजी दरेकर हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी गुरुवारी सकाळी आ. कराड यांच्या संवाद भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली असता उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. दरेकर यांनी विश्वास दिला. प्रारंभी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी आमदार प्रवीणजी दरेकर यांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले. यावेळी खा. सुधाकर शृंगारे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, रेणापूर तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

लातूर जिल्हा भाजपाचा मजबूत जिल्हा आहे, या जिल्ह्यावर नेतृत्वाचे बारीक लक्ष असून भविष्यातही लातूर जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला कायम असेल असे सांगून आ. प्रवीणजी दरेकर म्हणाले की सत्तेचा काळ येतो आणि जातो मात्र सत्तेचा लाभ घेण्यासाठी आपण काय प्रयत्न केला हा खरा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपले सरकार कार्यकर्त्याच्या मागे उभे आहे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सत्तेचा उपयोग करून घ्यावा. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब २४ तास काम करतात, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब अहोरात्र परिश्रम घेत आहेत तेव्हा जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरील भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत असावे येणारा काळ हा भाजपाचाच असेल असे बोलून दाखविले.

प्रारंभी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी जिल्ह्यातील भाजपाच्या कार्याचा आढावा दिला. यावेळी प्रदेश भाजपाचे अनिल भिसे, भागवत सोट, सतीश आंबेकर, बुथ अभियानाचे तुकाराम गोरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, सुरज शिंदे संगायो समितीचे रेणापूर तालुकाध्यक्ष वसंत करमुडे, दीपक वांगस्कर, सज्जन लोणाळे, हनुमंतबापू नागटिळक, सुधाकर गवळी, अशोक सावंत, संभाजी वायाळ, शरद दरेकर, विजय चव्हाण, राजकारण साठे, रमा फुलारी, काशिनाथ ढगे, बालाजी दुटाळ, लक्ष्मण नगिमे, रुपेश काळे, नानासाहेब कस्पटे, ज्ञानेश्वर जुगल, ज्ञानोबा भिसे, ललिता कांबळे, लताताई भोसले, शीला आचार्य, अनुसया फड, श्रीकृष्ण जाधव श्रीकृष्ण पवार, अनंत पाटील, अच्युत भोसले, उत्तम चव्हाण, उज्वल कांबळे, वैजनाथ हराळे, गणेश चव्हाण, सुधाकर शिंदे, जलील शेख, माधव घुले, ईश्वर बुलबुले, बालासाहेब कदम, शंकर चव्हाण, संतोष चव्हाण, प्रशांत शिंदे, बालासाहेब कदम यांच्यासह अनेक भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.