32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeसामाजिकआ.निलंगेकरांच्या पाठपुराव्यानंतर नदीपाञात सोडले पाणी

आ.निलंगेकरांच्या पाठपुराव्यानंतर नदीपाञात सोडले पाणी

नदी काठावरील गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला

आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्याने धनेगाव बॕरेजमधील पाणी नदी पात्रात सोडल्याने नदी काठावरील गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

निलंगा (प्रतिनिधी)

निलंगा विधानसभा मतदार संघातील मांजरा नदीवरील धनेगाव बॅरेज परतीच्या पावसामुळे सर्व क्षमतेने भरले आहे. सध्या धनेगाव बंधाऱ्या खालील अंदाजे वीस किलोमीटर नदीपात्र पाण्याअभावी कोरडे पडले असल्यामुळे नदीलगतच्या धनेगाव शिवार धरणा खालचा भाग शिउर, नदीवाडी, हंचनाळ, टाकळी, चिचोंडी, या गावातील नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता तसेच जणावरांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते त्यामुळे पाण्यासाठी भटंती करावी लागत होती या भागातील पिके धोक्यात आली त्याचबरोबर जनावरांना व माणसांना पाण्याविना भटकण्याची वेळ आल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी धनेगाव बॅरेज मधील पाणी नदीपात्रात सोडावे व शेतकऱ्यांचे व जनावरांची पाण्याविना हाल दूर करावे. या भागातील अनेक गावचे नागरिक माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन पाणी नदीपात्रात सोडण्याची विनंती केली आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लातूर व व संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला व परिस्थितीचे गांभीर्य संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तात्काळ धनेगाव बॅरेज मधील पाणी नदीपात्रात सोडावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी लातूर यांच्या आदेशान्वये कार्यकारी अभियंता यांनी एक एम एम पाणी नदीपात्रात सोडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी सोडलेल्या नदीपात्रातील पाण्यात जाऊन आनंद व्यक्त केला व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार मानले व आनंद व्यक्त केला यावेळी शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी पाटील नदीवाडीकर, माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे, मधुकर थोटे, सुग्रीव गंपले, अंकुश बिराजदार तुकाराम बैनगिरे, किशन बोरुळे, संजय पाटील, मिलन बिराजदार, चंदू पाटील, धनराज बिराजदार, आदीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]