लातूर दि.३१ – भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिवसानिमीत्त लातूर नजीक मौजे नांदगाव येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पवनपुत्र हनुमान मैदानी कुस्ती स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. शेवटची मानाची कुस्ती दिपक कराड यांनी जिंकली त्यांना रोख पंचेवीस हजार रूपये आणि चांदीची हनुमानमूर्ती देवून सन्मानित करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिनानिमीत्त युवा नेते ऋषिकेश कराड मित्र मंडळाच्या वतीने ३० मे २०२२ सोमवार रोजी लातूर तालूक्यातील मौजे नांदगाव येथे पवनपुत्र हनुमान मैदानी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला कुस्ती खेळाडूंनी मोठा प्रतिसाद देवून स्पर्धेत सहभाग घेतला. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेल्या स्पर्धा रात्री ९ वाजता संपल्या. या स्पर्धेत तब्बल ११० कुस्त्या झाल्या. प्रकाश झोतातील मैदानी कुस्त्या पाहण्यासाठी खेळाडू, तरूण आणि नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.
सदरील कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड यांच्या हस्ते झाला तर जेष्ठ मार्गदर्शक श्री काशीरामनाना कराड यांच्या हस्ते पारितोषकाचे वितरण करण्यात आले. शेवटची मानाची कुस्ती राहूल मुळे आणि दिपक कराड यांच्यात अटीतटीची झाली त्यात दिपक कराड यांनी बाजी मारून विजय हस्तगत केला. त्यांना रोख पंचेवीस हजार रूपये आणि चांदीची हनुमानमूर्ती देवून गौरव करण्यात आले. आकरा हजार रूपयाच्या फेरोज शेख व प्रकाश जाधव आणि भरत कराड व बालाजी साळूंके यांच्यात दोन कुस्त्या झाल्या. त्यात फेरोज शेख आणि भरत कराड यांनी विजय संपादन केला.
पवनपुत्र हनुमान मैदानी कुस्त्या यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश कराड मित्र मंडळाचे बालासाहेब शेप, आशिष क्षिरसागर, उध्दव जाधव, समाधान कदम, किशोर काटे, गोपाळ मुंडे, आकाश जाधव, संतोष जाधवर, बाळू कोपनर, विकास मुंडे, राजाराम पाडोळे, अतूल बोमणे, शंकर मुंडे, श्रीधर जाधव, अभिजीत गोपळघरे, विष्णू भोसले, गेगाधर दुधाळे यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतली.