गातेगाव येथील राधाकृष्ण मंदिर, निवळीच्या निळकंठेश्वर देवस्थान विकासासाठी आ. कराड यांच्या प्रयत्नातून ४ कोटीचा निधी मंजुर
लातूर दि.१४– लातूर तालुक्यातील मौजे गातेगाव येथील राधाकृष्ण मंदिर आणि निवळी येथील श्री निळकंठेश्वर मंदिर देवस्थानच्या विकास कामासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी २ कोटी एकूण ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दोन्ही ठिकाणच्या मंदिर परिसर विकासाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने ग्रामस्थासह मंदिराच्या भाविक भक्तात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मौजे गातेगाव येथे परमपूज्य विद्यानंदजी सागर महाराज यांच्या अध्यात्मिक कार्यातून श्री राधाकृष्ण अध्यात्म आश्रम कार्यरत आहे. या राधाकृष्ण मंदिर परिसराचा विकास व्हावा सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी या आश्रमाच्या भाविक भक्तांनी तसेच लातूर तालुक्यातील मौजे निवळी येथील ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी ग्रामस्थाच्या आणि भाविकांच्या वतीने भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडे गातेगाव आणि निवळी दौऱ्यात केली होती. त्यावेळी दोन्ही ठिकाणच्या मंदिराचा लवकरच जिर्णोद्धार करण्यात येईल, शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सर्वांगीण विकास केला जाईल अशी ग्वाही दिली होती.

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गिरीशजी महाजन साहेब यांच्याकडे गातेगाव आणि निवळी येथील दोन्ही मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेतून निधी मिळावा याकरिता भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्यामुळे गातेगाव येथील राधाकृष्ण मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकाम करणे, सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, मंदिर संरक्षण भिंत बांधकाम करणे, पाण्याची टाकी व पाईपलाईन आदी विकासकामाकरिता तब्बल २ कोटी रुपयाचा आणि लातूर तालुक्यातील मौजे निवळी येथील निळकंठेश्वर मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकाम करणे, मंदिर परिसराचा रस्ता करणे आणि विद्युतीकरणाचे कामे करणे याकरिता तब्बल १ कोटी ९२ लक्ष रुपयाचा निधी राज्याच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राच्या विकास कामांना मान्यता या योजनेतून १३ मार्च २०२४ रोजी च्या शासन निर्णयानुसार राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. गिरीशजी महाजन साहेब यांनी मंजुरी दिली आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अनेक गावा गावातील वाडी वस्तीतील मंदिराच्या जिर्णोदरासाठी शासनाच्या विविध योजनेतून आ. रमेशआप्पा कराड यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला आहे. गातेगाव आणि निवळी येथील मंदिराचा सर्वांगीण विकास व्हावा भाविकांची ही इच्छा आ. रमेशआप्पा कराड यांनी प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून पूर्ण केली आहे. सदरील निधी मंजूर झाल्याचे वृत्त समजतात गातेगाव, निवळी आणि त्या परिसरातील भाविक भक्तांनी आनंद उत्सव साजरा केला.
गातेगाव आणि निवळी येथील मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला शब्द पुर्ण केल्या बद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे भाजपाचे बन्सी भिसे, भागवत सोट, हनुमंतबापू नागटिळक, वैभव सापसोड, सुरज शिंदे, नाथसिंह देशमुख, अभय सोनपेठकर, नागनाथ बनसोडे, ज्ञानेश्वर जुगल, अमित जावळे, विश्वास कावळे, काशिनाथ ढगे, विकास शिंदे, मारुती माने, बिहारीलाल मानधने, जयसिंग चौंडे, धनंजय जुगल, पांडुरंग गडदे, ईश्वर बुलबुले, बाळासाहेब पंडा, अरुण सुरवसे, सुरेश सूर्यवंशी, संतोष जगताप, विनायक मगर, बाळासाहेब देशमुख, बालाजी दुटाळ, सौरव देशमुख, आर आर शिंदे, दिलीप सागर, उद्धव रसाळ, रामलिंग विभुते यांच्यासह त्या त्या गावातील आणि परिसरातील भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांसह भाविक भक्त आणि नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.