माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील लोकमान्य टिळक चौकात लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त केले विनम्र अभिवादन
लातूर प्रतिनिधी
माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज दिनांक 22 जुलै रोजी सकाळी लातूर शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून संपादक लेखक लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, प्रा. बी.वी मोतीपोवळे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक अशोक गोविंदपुरकर, वर्षा कुलकर्णी, लोकमान्य टिळक विचार मंचचे अध्यक्ष संजय निलेगावकर, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे, सचिव प्राध्यापक जयंत शास्त्री, कोषाध्यक्ष शेषराव कुलकर्णी, धनंजय बोरगावकर,नरेंद्र कुलकर्णी, महादेव कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उत्तराधिकारी मठाचे रघुमताचार्य जोशी, रविशंकर जाधव,व्यंकटेश फारुख शेख, गौरव काथवटे, आयुब मणियार दत्ता सोमवंशी गोरोबा लोखंडे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक लोकमान्य टिळक विचार मंचचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रात यशवंत झालेल्या शामराव शास्त्री चेअरमन उर्फ प्रमोद उर्फ पापा कुलकर्णी यांचा आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आमदार अमित देशमुख म्हणाले की, लोकमान्य टिळक चरणी नतमस्तक होऊन मी जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजे आपले लातूर शहर आहे लोकमान्य असे व्यक्तिमत्व भारताच्या स्वातंत्र्य चळवळ खऱ्या अर्थाने उभी केली त्यांचे नाव म्हणजे लोकमान्य त्यांचे वास्तव्य लातूरत होते हे आपले सौभाग्य. लातूरच्या भूमीचे वैशिष्ट्य त्यांना आकर्षित केले कर्मभूमी ही लातूर होते त्यांची लातूर ही बाजारपेठ आहे याचा शोध लोकमान्य टिळकांना लागला त्यांनी येथे उद्योग उभे केले. लातूर शहरात लोकमान्य टिळक यांची स्मारक उभे राहण्यासाठी मनपा पुढाकार घेत आहे, राज्यानेही मदत केली आहे. या परिसरात टिळकांना स्मारक शहरात उभे राहील या स्मारकासाठी निधी परवानगी मंजूर केले आहेत, या चौकाचे सुशोभीकरण नव्याने हाती घेतले पाहिजे, लोकनेते विलासराव देशमुख महसूलमंत्री असताना तत्कालीन नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे व तत्कालीन विरोधी पक्षनेते अशोक गोविंदपूरकर यांनी जळगाव पॅटर्न पाहून या ठिकाणच्या यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाची उभारणी केली. बदलत्या युगामध्ये लातूर ही बदलेल आणि पुढे बोलताना ते म्हणाले की, माणसं किती श्रीमंत होतात याला महत्व नाही तर माणसं किती आनंदी होतात याला महत्त्व आहे हा दृष्टिकोन नीती ठेवली पाहिजे.

पुढे बोलताना ते म्हणाले की देशातील पहिले शहर लातूर आहे महिलांना मोफत सिटी बस प्रवास देणारे याची चर्चा देशभर झाली. लोकमान्य टिळक यांच्या नावाने लातूर व्याख्यानाला सुरू करावी अशी सूचना त्यांनी संबंधितांना केली. लोकमान्य टिळकांनी लातूरमध्ये पहिला गणेशोत्सव साजरा केला तोच गणेशोत्सव आज जगभर साजरा केला जात असतो. मनपा निवडणुका तीन-चार महिन्यात होतील काँग्रेस सर्व चांगले उमेदवार देईल, लातूर हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा विचारांचा वारसा असलेले शहर आहे. या शहराला गालबोट लागेल असे कृत्य माझ्या हातून घडले नाही आणि यापुढे घडणारही नाही अशी ग्वाही त्यांनी देऊन राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती संभाजी महाराज महाराणा प्रताप क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वीर शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू आदी महापुरुषांचे पुतळे लातूर शहरात उभारू अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, प्रा. बी.वी मोतीपोवळे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे , माजी नगरसेवक अशोक गोविंदपुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक लोकमान्य टिळक विचार मंचचे अध्यक्ष संजय निलेगावकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.जयंत शास्त्री यांनी केले तर शेवटी आभार बाळासाहेब देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.