औसा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेञातील गावनिहाय भरपावसात शेतकर्यांच्या बांधावर जाऊन आ.अभिमन्यु पवार यांनी केली पाहणी…
निलंगा,—( प्रशांत साळुंके )—औसा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेञातील गावनिहाय भरपावसात शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.सदर, मागील दिवसांतील सततच्या पावसामुळे आणि वादळामुळे ऊस, कोथिंबीर, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. आज आशिव गावातील शेतकरी अशोक बंडगर,युवराज पाटील व दत्तू जगताप यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडला आहे, पाणी लागून कोथिंबीरचे प्लॉट्स खराब झाले आहेत तर सोयाबीन पिकाचेही नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन गावातील नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी भाजप जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, सरपंच गोविंग मदने, उपसरपंच रमेश वळके, माजी जि. प. सदस्य बी. के. माने, युवराज पाटील, विनोद जगताप, हनुमंत माने, त्र्यंबक घोडके, रावसाहेब वळके, गोविंद जगताप, दस्तगीर शेख, मोहन आंबेकर, तंटामुक्तचे अध्यक्ष शिवाजी सावंत व शेतकरी बांधव उपस्थित होते.