औसा – गत दोन वर्षापासून आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघात हाती घेतलेल्या शेत तिथे रस्ता व मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गतच्या कामांची पाहणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दि. ४ जून रोजी औसा तालुक्यातील याकतपुर व वाघोली शिवारातील शेतीच्या बांधावर जावून करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
आ. अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी शेत तिथे रस्ता व मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियान हाती घेतले या अभियानांतर्गत औसा विधानसभा मतदारसंघात एक हजार किलोमीटर लांबीचे शेतरस्ते, तीनशे किलोमीटर लांबीचे शेतरस्ते कामाचे मजबुतीकरण, एक हजार जनावरांचे गोटे, एक हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली हे अभियान अल्पावधीत लोकचळवळ ठरली या रुपाने महाराष्ट्रात शेतरस्ते व मनरेगातून ग्रामसमृद्धीचा औसा पॅटर्न उदयास आला.या पॅटर्न ची दखल खुद्द महाविकास च्या आघाडी सरकारला घ्यावी लागली व आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या औसा पॅटर्न राज्यात शरद पवार ग्रामसमुध्दी योजनेच्या रुपाने राबविण्याचा निर्णय घेतला. आ. अभिमन्यू पवार यांनी या अभियानातून केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी दि.४ जून रोजी अंगात ताप आला असताना सुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतीचे बंधारे गाठले.औसा तालुक्यातील याकतपुर येथे मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गतच्या फळबाग, जनावरांचे गोठे व सौरऊर्जा प्रकल्पाची तर वाघोली शिवारात सिंचन विहिर व आमदार फंडातून झालेल्या शेतरस्त्याची पाहाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केली.
या दौऱ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचे लाभार्थी विजयकुमार बोळ, दिलीप बोळ, किशोर बोळ, गंगाराम दळवे यांच्याशी संवाद साधला.यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी आ. अभिमन्यू पवार यांच्या या अभियानामुळे या योजनेचा लाभ घेता आला ज्यामुळे शेतीपूरक व्यवसाया चालना मिळाली.फळबाग लागवडीतून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला.शेतरस्ते कामाने शेतीला शेतरस्ते मिळाले ज्यामुळे पिकवलेले माल योग्यवेळी बाजारात जातो व पळविण्यासाठी सर्व यंत्रणा शेतात येते असे सांगून या कामाचे समाधान व्यक्त केले. आ. अभिमन्यू पवार यांच्या या अभियानातून निर्माण झालेल्या