औसा नगरपरिषद क्षेत्रातील ५१ वेगवेगळ्या पायाभूत सुविधा विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
औसा – आ. अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून औसा नगरपरिषद क्षेत्रातील ५१ वेगवेगळ्या पायाभूत सुविधा विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असून या विकास निधीतून औसा शहराच्या विकासात भर पडणार आहे.या नव्या सरकारची औसेकरांना विकास कामाची पहिली भेट आहे.
या ५ कोटीच्या मजूर विकास निधीतून प्रभाग ८ मोरे गल्ली येथील पिंपळे निवास ते बालाजी पवार यांच्या घर सिमेंट रस्ता १० लक्ष रुपये, प्रभाग ७ भुसारवेस ते बाबूनाथ जोगी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तसेच प्रभाग २ रुपेश कारंजे ते मुक्तेश्वर रोड पर्यंत नाली बांधकाम करणे १५ लक्ष रुपये, औसा शहरातील नागराज पेट्रोल पंप शेजारील राष्ट्रीय महामार्ग ते अपसिंगेकर यांचे रोहाऊस पर्यंत जाणारा रस्ता १० लक्ष रुपये, प्रभाग ८ किल्ला टाकी ते भुसार गल्ली पाईपलाईन करणे १० लक्ष , प्रभाग २ वीरभद्र राचट्टे यांचे घर ते प्रकाश ङोंगे यांच्या पर्यत सिमेंट रस्ता १४ लक्ष रुपये, प्रभाग ६ फहिम शेख यांचे घर ते फ्रेंड्स हाॅटेल सिमेंट रस्ता व प्रभाग ९ रामेश्वर दुधनकर यांचे घर ते हनुमान मंदिर डांबरीकरण १५ लक्ष रुपये, प्रभाग ४ सोनवळकर ते राम मसलगे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रुपये, प्रभाग ३ सचिन मोरे यांचे शिंदे यांचे घर सिमेंट रस्ता व नाली बांधकाम १० लक्ष, प्रभाग ५ कालन गल्ली मस्जिद ते आझाद चौक सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग १० हिमायत पटेल यांचे घर ते मस्जिद सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ४ स्वामी यांचे घर ते महामुणी यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग २ विजय राचट्टे यांचे घर ते महाराणा प्रताप नगर नाली बांधकाम व प्रभाग ३ लांडगे यांचे घर ते सडू यांचे घर सिमेंट रस्ता १५ लक्ष, प्रभाग ४ वीरभद्र कल्याणी ते स्वामी यांचे घर डांबरीकरण १० लक्ष, प्रभाग ८ घोगरे ते कोरके यांचे घर बंदिस्त नाली बांधकाम १० लक्ष, प्रभाग ६ गांधी चौक ते सगरे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ७ धाराशिवे हाॅस्पिटल ते अहिल्याबाई होळकर चौक सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ८ राजकुमार पवार ते कोरके यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष,
प्रभाग ९ कैकाड गल्ली ते मोरे गल्ली डांबरीकरण १० लक्ष, प्रभाग १ संतोष चिकूडेकर ते नरहरे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष,प्रभाग ४ दळवे ते शिवशंकर कल्याणी यांच्या घरापर्यंत डांबरी रस्ता करणे १० लक्ष, प्रभाग ७ माळी गल्ली चौक ते सचिन माळी यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ८ राम स्वामी यांचे घर ते हिरेमठ लादीकरण रस्ता व सचिन उडगे ते शंकर स्वामी यांचे घर नाली बांधकाम १० लक्ष, प्रभाग ९ मारूती मंदिर सभागृह ते समशोद्धीन शेख यांचे डांबरीकरण १० लक्ष,प्रभाग १ तोळमारे ते स्वामी यांचे घर सिमेंट रस्ता व प्रभाग ४ बासले ते चौधरी यांचे घर सिमेंट रस्ता १५ लक्ष, प्रभाग ८ महालिंग कारंजे ते राजूरे यांचे घर रस्ता व नाली बांधकाम २० लक्ष, प्रभाग ७ दास साळुंके यांचे घर ते जिजामाता विद्यालय सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ९ नितिन शिंदे यांचे घर ते पोलीस स्टेशन सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ८ राजूरे ते शेरु पटेल यांचे घर सिमेंट रस्ता व नाली बांधकाम २० लक्ष, प्रभाग ३ अपसिंगेकर ते कुरसुळे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ४ अभिमन्यू भोसले ते माधव राठोड घर सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ७ भागवत कांबळे यांचे घर ते धनगर गल्ली समाज मंदिर सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग १ लोकरे ते सुभाष राजूरे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ८ सतिश नाईक ते अॅड पटेल यांचे घर सिमेंट रस्ता व नाली १० लक्ष, प्रभाग ७ अहल्यादेवी होळकर चौक ते किसन कांबळे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ४ माशाळकर ते गोरख पाटील यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष,
यासह वैकुंठ हनुमान मंदिर संरक्षण भिंत १० लक्ष, मराठा ते मारवाडी स्मशानभूमी सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग १० महादेव कांबळे यांचे घर ते वीर हनुमान ते मराठा स्मशानभूमी सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ४ सज्जनगड काॅलनी – दत्ता चांदूर ते नागरसोगेकर यांचे घर रस्ता १० लक्ष, प्रभाग ८ मुसदिक यांचे घर – औसेकर – हनुमान मंदिर नाली बांधकाम १० लक्ष, प्रभाग २ सुदर्शन यांचे घर ते मुक्तेश्वर रोड नाली बांधकाम १० लक्ष, प्रभाग ७ माणिक फुटाणे ते राजेंद्र वडगावे यांचे सिमेंट रस्ता १० लक्ष, प्रभाग ७ स्वामी रामानंद तीर्थ स्मारक संरक्षण भिंत व शुशोभीकरण १० लक्ष, प्रभाग ८ बजाज ते दुरुगकर यांचे घर रस्ता १० लक्ष, प्रभाग २ नरहरे ते महेश वागदरे यांचे घर बंदिस्त नाली बांधकाम १० लक्ष, प्रभाग १० वीर हनुमान मंदिर रोड ते मराठा स्मशानभूमी नाली बांधकाम १६ लक्ष आदी कामांचा समावेश आहे. आ. अभिमन्यू पवार हे अनेक विषयांच्या विकासकामांचा पाठपुरावा करत असून नजीकच्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर होतील.