28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeशैक्षणिक*आ. अभिमन्यू पवार -क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल - जी.श्रीकांत*

*आ. अभिमन्यू पवार -क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल – जी.श्रीकांत*

आमदार अभिमन्यू पवारांच्या संकल्पनेतील औशाच्या शिक्षणाचा नवा अध्याय राज्यभर आत्मसात होणार – जी.श्रीकांत

औसा – शिक्षणाचे महत्त्व काय आहे याचे उत्तम उदाहरण खुद्द मी आहे. माझे वडिल शेतकरी होते.माझ्या शिक्षणासाठी लागणारा खर्च पाहाता माझ्या नवीन साडी घेतली नाही. आणि याच शिक्षणासाठी शेती विकली आणि त्याच शेतात माझ्या आई – वडीलांनी मजुरी केली. या सर्व परिस्थितीत मी जिद्दीने शिक्षण घेतले आणि आज तुमच्यासमोर मी सनदी अधिकारी म्हणून उभा आहे केवळ आणि केवळ शिक्षणाच्या जोरावर ज्या शेत रस्त्याचा पॅटर्न राज्यभर गाजतोय त्या शेतरस्ते पॅटर्नला माझ्या कार्यकाळात हातभार लागला त्याच ते सर्व श्रेय आमदार अभिमन्यू पवार यांचे आहे. शेतरस्ते, पाणी या मूलभूत गरजा बरोबर शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे म्हणून राज्यात शेतकऱ्यांचे जाळे निर्माण करणारे आमदार ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतही औसा पॅटर्न करतील आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या पुढाकाराने राजमाता जिजाऊ शाळा माजी न्यारी हा स्तुत्य उपक्रम येथील विद्यार्थ्याच्या कर्तुत्ववाचा डंका भविष्यात राज्यात गाजणार असा विश्वास छत्रपती संभाजीनगर चे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला ते लामजना येथे (दि.११) रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या पुढाकाराने साकारलेल्या राजमाता जिजाऊ शाळा माजी न्यारी या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

               या कार्यक्रमाला आलेले अधिकारी बहुतांश शेतकऱ्यांची मुले आहेत.शिक्षणाचे महत्व आपल्यामध्ये आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द हावी आपली मुले शिक्षणात देहवेडी व पुढे काहीतरी घडवणार असा विश्वास आपल्या शेतकरी बापाला वाटला तर त्या मुलांच्या शिक्षणासाठी वेळप्रसंगी स्वतःची जमिन विकायची वेळ आली तर ती विका विशेषता मुलींसाठी हे करणे आवश्यक आहे. मुलगी वयात आली कि दहावी नंतर शिकू द्यायची नाही तिचे लग्न करायचा असा विचार अनेक पालकांचा असतो पण आता परिस्थिती बदलली आहे. जोपर्यंत मुलगी शिक्षणाला कंटाळून जाणार नाही तोपर्यंत तिला शिकवा तीचे शिक्षण पुर्ण झाल्यावरच तिचे लग्न करा. आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण व्यवस्था त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृती यावी तसेच हायटेक शिक्षण मिळावे म्हणून सुरू केलाला हा उपक्रम अत्यंत पथदर्शी आहे. शिक्षणाबरोबरच शाळेत मैदानी खेळ गाजवण्यासाठी क्रीडाणही आवश्यक असल्याने या उपक्रमाअंतर्गत याला प्राधान्य दिल्याने शिक्षक गुरुजींनी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमधील खेळाबद्दल असलेले कलागुण लक्षात घेऊन त्या धर्तीवर विद्यार्थी घडविणे तेवढेच गरजेचे आहे. आमदार अभिमन्यू पवार याचीही संकल्पना आगामी काळात याच मतदारसंघातील शिक्षण, खेळ व इतर माध्यमातून येथील मुले राज्यात नवा औसा पॅटर्न केल्याशिवाय राहणार नाही.असे ते म्हणाले. यावेळी मंचावर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे सचिव सुहास पाचपुते,शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, तालुका शिक्षणाधिकारी गोविंद राठोड, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, सभापती शेखर सोनवणे, हभप दतात्रय पवार गुरुजी, अॅड परिक्षीत पवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण उटगे,काकासाहेब मोरे, सौ. पार्वती पवार, सौ. शोभा अभिमन्यू पवार, कल्पना ढविले, प्रभारी सरपंच बालाजी पाटील, मुख्याध्यापक जी आर भोजने, बी एस शिंदे, संजय बिराजदार, युवराज बिराजदार, प्रा सुधीर पोतदार, याकूब मिर्झा, अशोक दंडगुले, सचिन कांबळे,बालाजी शेळके, सत्तार मिर्झा आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिपक चाबुकस्वार यांनी केले. 

………………

माझे माहेर लातूर

कुठल्याही सामाजिक कार्यक्रमास लातूरचे निमंत्रण आगत्याचे असते मीही लातूरच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो माझ्या मुलीचा जन्म लातूर ला झाल्याने ती स्वताच्या नावासोबत लातूरकर लावते माझे व लातूरचे नाते लग्न झालेल्या मुलीसारखे आहे लग्न होऊन मुलगी जशी सासरी जाते तसेच माहेरच्या कुठल्याही कार्यक्रमास हजेरी लावते तसेच लातूर माझे माहेर असल्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.

…………………

शिक्षणाच्या पलीकडे जाऊन पिढी घडवणार – आ अभिमन्यू पवार

ग्रामीण शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राजमाता जिजाऊ शाळा माजी न्यारी हि संकल्पना आगामी काळात शिक्षणाच्या पलीकडे जाऊन पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले शिक्षणासोबत संगणकीय ज्ञान माहिती तंत्रज्ञान तसेच मैदानी खेळ, यासह विविध उपक्रम यामध्ये राबविले जाणार आहेत प्रायोगिक तत्त्वावर मतदारसंघातील तीन जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानंतर तो मतदारसंघातील ७७ शाळेमध्ये राबविण्यात येईल पारंपरिक खेळ, तंत्रज्ञानाचे शिक्षण याची जोड घालून आयएएस, युपीएससी अधिकाऱ्यांचे आॅनलाइन मार्गदर्शन या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचे यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

……………………………

सर्वतोपरी सहकार्य करणार – अनमोल सागर

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आमदार अभिमन्यू पवार व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन याचबरोबर हा उपक्रम जिल्हा भरातील शाळेच्या माध्यमातून कसा राबविता येईल यासाठी प्रयत्नशील राहणार असे सांगून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]