लातूर ; दि.३०( प्रतिनिधी )-
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात तसेच वधु-वर सूचक क्षेत्रात मध्ये विश्वासहार्ततेने काम करणारे सप्तफेरे वधू वर सूचक केंद्र कडून दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करून त्यांना कौतुकाची थाप म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो.
याचप्रमाणे गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक,राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे तसेच सामान्य शेतकरी आणि कष्टकरी व शेतमजुरांच्या वेदना जाणून घेऊन त्यावर संवेदनशीलपणे विचार करून त्यांच्या आयुष्यामध्ये अमुलाग्र बदल घडून आणण्याचे स्वप्न व पिढ्यानपिढ्यापासून भेडसावत आलेल्या विषयावर लक्ष देऊन औसा तालुक्यातील शेतीला जाण्यासाठी असणाऱ्या पांदण रस्त्याचा प्रश्नावर काम करून फक्त पंधरा महिन्यांमध्ये 1000 किलोमीटर पेक्षाही जास्त तालुक्यातील पांदण रस्त्याचे काम पूर्ण करून महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात दखल घेण्याजोगे काम करून दाखवल्याबद्दल व 1000 पेक्षा जास्त मुक्या प्राण्यांसाठी गोटे बांधून देण्याचे कार्य केले असून सर्वसामान्य व शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी अनेक विषयावर ते उत्तमपणे काम करत आहेत यासाठी त्यांच्या कामाला कौतुकाची थाप म्हणून दिनांक 29 जुलै 2022 वार शुक्रवार रोजी सप्तफेरे वधू वर सूचक कडून .आ.अभिमन्यू पवार यांना कार्यसम्राट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्काराला उत्तर देताना आ. अभिमन्यू पवार म्हणाले हा पुरस्कार मी रहद्यापासून स्वीकारला असून या पुरस्कारामुळे आणखी मला ऊर्जा मिळाली आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा प्रभारी संतोषप्पा मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाषजी जाधव तर प्रमुख उपस्थिती म्हणून लातूरचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नागनाथ गीते, भाजप युवा मोर्चा औसा तालुका अध्यक्ष धनराजप्पा परसणे, दैनिक पुण्यनगरीचे ब्रह्मानंद आचार्य, प्रदीप आचार्य, लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकिरण सूर्यवंशी व सचिव व संपादक दत्तात्रेय परळकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हा अध्यक्ष लहूकुमार शिंदे,प्रसिध्दी प्रमुख संतोष सोनवणे, विधी सल्लागार जितेंद्र पाटील,बसवसेवा संघ संस्थापक अध्यक्ष बालाजी पिंपळे, , गंगाधर डिगोळे, योगानंद जोशी, प्राचार्य मद्दे सर, रामदास माने, काकासाहेब घुटे, संभाजी तांदळे, दत्तात्रेय सोनवणे, जितेंद्र सराफ, सुनील ताडमडगे, अमोल घायळ, सुनील ईबितदार तसेच सप्तफेरेचे संस्थापक संजय राजूळे व संचालक माधव तरगुडे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.