लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख ६ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत.
लातूर जिल्ह्य़ासाठी ९३ कोटी ३६ हजाराची मदत…
औसा – गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनसह खरिप हंगामातील पिकांच्या नुकसान संदर्भात आ. अभिमन्यू पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात चर्चा घडवून आणली यानंतर लक्षवेधी मांडल्यानंतर राज्याचे कृषीमंत्र्यानी औसा तालुक्याचा दौरा केला.या दौऱ्यात पाहाणी केल्यानंतर कृषीमंत्र्यानी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून तात्काळ मदतीची आश्वासन दिले.मात्र यानंतर पुढील प्रक्रिया होत नसल्याने पुन्हा उपमुख्यमंत्र्यांना भेटून बोंडअळीच्या धर्तीवर गोगलगाय प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी व शासनाने तो शासकीय आदेश लवकर काढून मदत देण्याची मागणी केली. यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात शासकीय आदेश काढत निधीही उपलब्ध करून दिला आहे.

गोगलगाय प्रादुर्भावाने लातूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते गोगलगाय प्रादुर्भावाने नुकसान झाल्यानंतर त्यासाठी मदतीची तरतूद एनडीआरएफ व एसडिआरफ मध्ये नसल्याने या शेतकऱ्यांना बोंडअळीच्या धर्तीवर गोगलगाय प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात आ. अभिमन्यू पवार यांनी केली.तसेच एका व्हिडिओ चित्रीकरण च्या माध्यमातून गोगलगाय कशा प्रकारे पिकांना फस्त करते याचे वास्तव्य त्यांनी समोर आणत या संदर्भात लक्षवेधी मांडल्यानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औसा तालुक्याचा दौरा केला.या पाहाणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तात्काळ मदतीची आश्वासन दिले होते. मात्र पुन्हा याप्रकरणी पुढील प्रक्रिया होत नसल्याने दि. ९ सप्टेंबर रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन या संदर्भात शासकीय आदेश लवकर काढण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती. यानंतर दि.१४ सप्टेंबर रोजी यासंदर्भात गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी मदतीचे शासकीय आदेश काढण्यात आले आहेत. यानुसार लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्य़ातील १ लाख ६ हजार १२ शेतकऱ्यांना हि मदत मिळणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्य़ातील ६८ हजार २९५ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी ९२ हजार ६५२ शेतकऱ्यांना ९३ कोटी ३६ हजार ऐवढी मदत मिळणार आहे. लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील ७२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र गोगलगाय प्रादुर्भावाने बाधीत झाले होते.एनडिआरएफ च्या पहिल्याच्या निकषांनुसार हि मदत दुप्पट असून दोन हेक्टरची मर्यादा वाढवून हि मदत तीन हेक्टर पर्यंत मिळणार आहे.
आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना हि मदत मिळाली असून मदतीचा शासकीय आदेश काढून यासंदर्भातील निधीची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हि रक्कम जमा केली जाणार आहे.
संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदतीसाठी पाठपुरावा करू..
याबाबत आ. अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहेत. तसेच संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीची मदतीचा प्रलंबित असून याचाही मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले