16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeआरोग्य वार्ता*आशिव येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबीरात पंधराशे रुग्णांची तपासणी*

*आशिव येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबीरात पंधराशे रुग्णांची तपासणी*

आरोग्य व शिक्षणाला प्राधान्य देणार – आ अभिमन्यू पवार

औसा – मतदारसंघातील विकास कामाबरोबर प्राधान्याने आरोग्य व शिक्षणाला प्राधान्य देण्यात येईल यासाठी मतदारसंघातील १४ सर्कलमध्ये मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असून याव्दारे आरोग्य तपासणी, औषधोपचार व गंभीर आजार आढळलेल्या रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येतील याचबरोबर शिक्षणाच्या बाबतही विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले ते क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून तसेच इंद्रेस/हौसर आणि महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या मदतीने (दि.१७) रोजी औसा तालुक्यातील आशिव येथे आयोजित आरोग्य शिबीरात बोलत होते.

        या शिबिरात १५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी चे इंद्रेस/हौसर चे एमडी मंगेश देसाई, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे सचिव सुहास पाचपुते, बाजार समिती संचालक रमेश वळके पाटील, सरपंच सौ कोमल रमेश वळके, उपसरपंच सौ वैशाली लक्ष्मण दुधभाते,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण उटगे, संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, सुनील उटगे, विकास नरहरे, युवराज बिराजदार, प्रा सुधीर पोतदार, युवराज पाटील, संजय कुलकर्णी,धनराज परसणे, माजी सरपंच गोविंद मदने, बी के माने, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सावंत, प्रविण कोपरकर, चंद्रकांत ढवण, निळकंठ शिंदे, विष्णू कोळी, बाबासाहेब पाटील, नामदेव माने, विनोद जगताप, नामदेव काकडे, लक्ष्मण दुधभाते, मनोज दुधभाते, मनोज लोखंडे, पिरपाशा शेख, महादेव जाधव, सतीश बनसोडे, धनराज घोडके, दीपक बंडगर, सुनील सावंत, श्रीनिवास मदने, कुमार काकडे, पवन माने, गोविंद पवार, युवराज पाटील, अमर पवार, संतोष हलकरे, श्रीनिवास गोरे, माधव सुर्यवंशी, विठ्ठल पवार, उमाकांत चव्हाण, मोहन कावळे, बाजीराव जाधव, अमोल चेंडके, काकासाहेब भोसले, मुख्याध्यापक गरड, महादेव पवार, सचिन वळके, राजेश वळके, शिवम पटने, गोविंद जगताप, मारुती लोभे, श्रीनिवास मदने आदी उपस्थित होते. या शिबिरात गंभीर आजरपण आढळलेल्या रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत.शिबिरासाठी आलेले वैद्यकीय चमू, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका कर्मचारी, स्काऊट गाईड चे स्वयंसेवक यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]