16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसांस्कृतिक*'आवर्तन ' चा शतकपूर्ती संगीत महोत्सव 24 व 25 जून रोजी लातुरात*

*’आवर्तन ‘ चा शतकपूर्ती संगीत महोत्सव 24 व 25 जून रोजी लातुरात*

लातूर ; दि.१६ ( प्रतिनिधी) -- गेली 99 महिन्यांपासून अविरत सुरू असलेल्या या आवर्तन मासिक संगीत सभेच्या शतकपूर्तीचा अखेर मुहूर्त ठरला ,
    शनिवार दिनांक 24 व रविवार दिनांक 25 जून 2023 या दोन दिवसीय होणाऱ्या संगीत महोत्सवामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कलावंतांची हजेरी लागणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने शनिवार दिनांक 24 जून रोजी धारवाड येथील किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पद्मश्री  पंडित एम वेंकटेशकुमार यांचे गायन व बनारस येथील प्रसिद्ध नर्तक पं. सौरव व गौरव मिश्रा यांचे कत्थक नृत्य सादर होणार आहे, तर रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी जयपुर अत्रोली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी डॉ. अश्विनी भिडे - देशपांडे यांचे गायन व उस्ताद शाकीर खान यांचे सतार वादन सादर होणार आहे.
   या सर्व कलावंतांना तबला संगत पं. मुकुंदराज देव , पं. मुकेश जाधव ,श्री. प्रशांत पांडव , संवादिनी संगत श्री अभिनय रवंदे श्री. विशाल मिश्र तर सतार साथसंगत श्रीमती अलका गुर्जर या करणार आहेत.
    हा संपूर्ण संगीत महोत्सव दयानंद सभागृह लातूर या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेशिका रियल हनी शॉप, ठाकरे चौक, लातूर या ठिकाणी उपलब्ध असतील. प्रवेशिका साठी संपर्क क्र. 9422795796
शास्त्रीय संगीत सातत्याने ऐकता यावे व ते जनमानसात रुजावे, नवीन शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी सहज उपलब्ध व्हावी आणि महत्त्वाचे म्हणजे, शास्त्रीय संगीताचा रसिक वर्ग वाढावा या उद्देशाने एप्रिल 2015 मध्ये या आवर्तन मासिक संगीत सभेची मुहूर्तमेढ काही शास्त्रीय संगीत उपासकांनी लातूरमध्ये रोवली व अखंडितपणे आज 99 महिने पूर्ण करून शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे,
केवळ शास्त्रीय संगीताचे विविध कार्यक्रम या मासिक संगीत सभेमध्ये आजपर्यंत आयोजित केले गेले. यामध्ये गायन, वादन आणि नृत्य या सर्व कलांचा समावेश आहे.


विशेष म्हणजे विविध विषयांवरील विविध ज्येष्ठ कलावंतांचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने सांगीतिक कार्यशाळांचे आयोजन, चर्चासत्रे ,कलावंतांच्या मुलाखती आयोजित केल्या जातात. यामध्ये पं. राजेंद्र मणेरीकर, पं. सत्यशील देशपांडे, पं. विजय कोपरकर यांचे सप्रयोग व्याख्यान, ध्रुपद गायक श्री. आशीष मिश्रा भोपाळ यांचे कंठ साधनेवर व धृपद गायकीवर कार्यशाळा, प्रसिद्ध नृत्यांगना सौ. मनीषा साठे यांची प्रकट मुलाखत तसेच पं. राहुल देशपांडे यांची प्रकट मुलाखत तसेच पं. कुमार गंधर्व यांच्या जीवनावरील “कुमार दर्शन” हा कार्यक्रम ध्वनिफितीद्वारे व दृकश्राव्य माध्यमाद्वारे सादरीकरणातून पं.कुमार दर्शन,विविध प्रहरामधील राग ऐकायला मिळावेत या हेतूने कार्यक्रमांचे आयोजन.
तसेच रसिकांना, संगीत शिकणाऱ्या संगीत साधकांना विविध वाद्यांची ओळख व्हावी या हेतूने विविध वाद्य वाजवणाऱ्या वादकांना संगीत सभेमध्ये आमंत्रित करुन त्या वाद्याची ओळख करून देणे व त्यांचे वादन ऐकवणे बासरी , सतार ,व्हायोलिन , स्पॅनिशवीणा , संवादिनी , तबला ,पखावज ,सुंद्री , संतूर इत्यादी अनेक वादक कलावंतांचे वादन आयोजित केले.


अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी ओतप्रोत भरलेल्या या आवर्तन च्या शतकपूर्ती दिमाखदार व ऐतिहासिक संगीत महोत्सवासाठी आपण सर्व रसिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा रसास्वाद घ्यावा, असे आवाहन शतकपूर्ती संगीत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष मा.श्री. दिलीपराव देशमुख , मार्गदर्शक श्री अतुल देऊळगावकर तसेच डॉ.अजित जगताप , श्री किरण भावठाणकर नियोजन समिती प्रमुख श्री. विशाल जाधव, आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, डॉ. संदिपान जगदाळे, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, प्रा.शशिकांत देशमुख व समस्त आवर्तन तसेच अष्टविनायक परिवार, लातूर यांनी केले आहे.

व्हीडीओ पुर्ण पहा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]