पं.कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनांनी जिंकली लातूरकरांची मने
लातूर , दि़.३० : – पं.कुमार गंधर्व यांनी गायलेल्या निर्गुण भजनाच्या माध्यमातून त्यांचा जीवनपटच रसिकांसमोर सादर करण्याचे काम रविवारी अतुल देऊळगावकर यांनी केले. पं.कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनांनी जिंकली लातूरकरांची मने
आवर्तनच्या वतीने घेण्यात आलेल्या भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पं.कुमार गंधर्व यांनी सादर केलेली निर्गुणभजने चित्रफितींच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर करण्यात आली. यावेळी पं.कुमार गंधर्व यांचा जीवनपटच रसिकांसमोर मांडण्यात आला. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी गायन सुरु केलेल्या कुमार गंधर्व यांना वयाच्या ८ व्या वर्षी पंडित ही पदवी देण्यात आली. पं.कुमार गंधर्व हे कधीही शाळेत गेले नाहीत. परंतु त्यांनी अनेकांना गुरुस्थानी मानले. क्षयरोगामुळे त्यांना वयाच्या २६ ते ३० वर्षापर्यंत गाता आले नाही. क्षयरोगालाही आपला गुरु मानणारे पंडीतजी यांच्या जीवनातील सकारात्मकता दिसून येते.क्षयरोगानंतर पंडीत कुमार गंधर्व निर्गुण भजनाकडे अधिक आकर्षीत झाले. क्षयरोगाच्या काळात त्यांनी संतांचा अभ्यास केला, लोकसंगीताचा अभ्यास केला, ऋतू संगीताचा अभ्यास केला. पंडीतजी देवासला गेले, नाथ संप्रदायाचा त्यांच्यावर प्रभाव होता. शिलनाथ महाराजांच्या शिष्याने पंडीतजींना ५०० निर्गुणभजन दिलेले होते. निर्गुण भजन म्हणजे शांत रस व्यक्त करणारे भजन होय.
पंडितजींनी निर्गुणी स्वरातून मौन दिलेले आहे, वैराग्य जानवते. आत्मकेंद्रीत वृत्तीमधून बाहेर येऊन जगाकडे पहा हा संदेश दिलेला आहे. निर्गुणी भजनातून शून्य निर्माण करण्याची शक्ती आहे. शून्य आकाशातून निघणारे सुरु म्हणजे निर्गुण.एका भिकाऱ्याकडूनही पं. कुमार गंधर्व यांनी निर्गुण भजन ऐकले. निर्गुण भजन गाऊ नये असा सल्लाही पं. कुमार गंधर्व यांना अनेकांनी दिलेला होता. परंतू त्यांनी निर्गुण भजन गायन थांबवले नाही.‘ निर्भय, निर्गुण गुन रे गाऊ्रंगा‘. ‘सुनता हे गुरु ग्यानी, गगण मे आवाज हो रही झिणी, झिणी ‘ ‘गुरुजी ने दियो अमर नाम ‘ ‘ माया महा ठगनी हम जानी ,‘ रमैया की दुलहिन लूटा बाजार जी , ‘ शुन्य गढ शहर शहर धर बस्ती , ‘ अवधूता, युगन युगन हम योगी ‘ , हिरना समझ बूझ बन चरना, ‘ उड जाएगा हंस अकेला, जग दर्शन का मेला ‘, कौन ठगवा नगरिया लूटत हो’, अशी विविध निर्गुण भजनांच्या चित्रफतींच्या माध्यमातून पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेल्या भजनांची मेजवानी रसिकांना देण्यात आली. शास्त्रीय संगीताची आवड असणारे रसिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.