लातूर दि. अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त हेतूने मागील 99 महिन्यांपासून आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने मासिक संगीत सभा अविरत सुरू आहेत. शतकपूर्ती संगीत महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी पाच वाजता दयानंद सभागृहात होणार आहे. शनिवार दिनांक 24 व रविवार दिनांक 25 जून 2023 या दोन दिवसीय होणाऱ्या संगीत महोत्सवामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कलावंतांची हजेरी लागणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने आज दिनांक 24 जून रोजी धारवाड येथील किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पद्मश्री पंडित एम वेंकटेशकुमार यांचे गायन व बनारस येथील प्रसिद्ध नर्तक पं. सौरव व गौरव मिश्रा यांचे कत्थक नृत्य सादर होणार आहे, तर रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी जयपुर अत्रोली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी डॉ. अश्विनी भिडे – देशपांडे यांचे गायन व उस्ताद शाकीर खान यांचे सतार वादन सादर होणार आहे.
या सर्व कलावंतांना तबला संगत पं. मुकेश जाधव, पं. मुकुंदराज देव ,श्री. प्रशांत पांडव , संवादिनी संगत श्री अभिनय रवंदे श्री. विशाल मिश्र तर सतार साथसंगत श्रीमती अलका गुर्जर या करणार आहेत. हा संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. या आवर्तनच्या शतकपूर्ती दिमाखदार व ऐतिहासिक संगीत महोत्सवासाठी सर्व रसिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा रसास्वाद घ्यावा असे आवाहन शतकपूर्ती संगीत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष दिलीपराव देशमुख , मार्गदर्शक अतुल देऊळगावकर तसेच डॉ.अजित जगताप, श्री किरण भावठाणकर नियोजन समिती प्रमुख श्री. विशाल जाधव, आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, डॉ. संदिपान जगदाळे, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, प्रा.शशिकांत देशमुख व समस्त आवर्तन तसेच अष्टविनायक परिवार, लातूर यांनी केले आहे.
संगीत महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी किरण भावठाणकर, विवेक डोंगरे , सुनील टाक, सतीश मिरकलकर, संजय सुवर्णका, केशव जोशी, महेश काकनाळे , राधाकृष्ण देशमुख, देवदत्त कुलकर्णी, अनाहत देशमुख, अधिराज जगदाळे , निसर्ग कुलकर्णी, जिगिषा ब्रह्मपुरीकर, कमलाक्षी कुलकर्णी, शर्वरी डोंगरे, आर्या कासारखेडकर आदी परिश्रम घेत आहेत.