जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने आपल्याकडे पावसाळ्याचे असतात. या तीन महिन्यात निसर्ग पावसाच्या रूपाने सगळं चिंब भिजवून टाकत असतो. उन्हाळ्याची लाही लाही झाल्यानंतर लगेचच येणारा हा पावसाळा सुखद वाटत असला तरी या पावसाळ्यामध्ये योग्य काळजी घेतली नाही तर, साथीच्या आजारांसह अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. म्हणूनच आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत, पावसाळ्यात आरोग्य चांगलं राहण्यासाठी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे ,याविषयी थोडीशी सविस्तर माहिती..!!
पावसाळा हा तसा वातप्रकोपाचा काळ असतो. या काळात कफदोषाचा संचय आणि वातदोषाचा प्रकोप होत असतो. यामुळे ज्यांची वातप्रकृती आहे त्यांनी या पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. अन्यथा, त्यांच्या वात व्याधी उफाळून येऊन वाताशी निगडित असणारे सांधेदुखी सारखे आजार डोकं वर काढण्याची शक्यता असते.

त्याचबरोबर पावसाळ्यात निसर्गात जलतत्त्व वाढलेले असल्याने आणि कामानिमित्त आपण बाहेर जातो तेव्हा वारंवार पावसात भिजण्याचा योग येत असल्याने सर्दी, खोकला, कफ अशा स्वरूपाचे आजारही डोकं वर काढत असतात.
पावसाळ्यात नद्यांना पूर येतो. यामुळे नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते. या पुराच्या पाण्यात अनेक गोष्टी मिसळतात. मृत झालेली जनावरे, पशुपक्षी सुद्धा या पुराच्या पाण्यातून वहात जातात. ठिकठिकाणी शहरातील तुंबलेली गटारे या पुराच्या पाण्यात मोकळी होत असतात. काठावरील घाण सुद्धा पुराच्या पाण्यामुळे नदीच्या मुख्य प्रवाहात येत असते. या सगळ्यामुळे नदीचे पाणी दूषित होत असते. असे दूषित पाणी पोटात गेल्यामुळे पचनाचे विकार, डीसेंटरी, वारंवार ताप येणे आणि व्हायरल इन्फेक्शन सारखे आजारही अधून मधून आपली हजेरी लावत असतात. या सगळ्यातून बचाव करून आपले आरोग्य चांगले राखायचे असेल तर आपणाला काळजी घेणे आवश्यक आहे. “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर,” म्हणजे आजारी पडल्यानंतर दवाखान्याच्या पायऱ्या झिजवण्यापेक्षा आणि औषधांचे शरीरावरील अत्याचार सोयण्यापेक्षा काळजी घेऊन निरोगी राहणे कधीही फायद्याचे असते.

आता आपण पाहूया पावसाळ्यात नेमकी कोणती कोणती काळजी घेणे आवश्यक आहे –
१. सर्वप्रथम हे हे लक्षात घेतले पाहिजे की कितीही चांगले वाटले तरी पावसात भिजणे टाळायला हवे. आवश्यकता नसेल तर शक्यतो पावसात घरातून बाहेर पडू नये.
२. पावसाळ्यात पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याचा वापर करू नये. असे पाणी दूषित असण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो घरातील पाणीच वापरावे. या काळात थंड पाणी पिणे टाळावे. शक्य तर उकळून गार केलेले पाणी पिणे अधिक चांगले असते.

३. पावसाळ्यात अग्नि मंद असतो. त्यामुळे भूक लागत नाही. याचा विचार करून भूक लागल्यानंतरच अन्नग्रहण करावे. भूक नसेल तर खाऊ नये, तहान लागली तरच पाणी प्यावे. शक्यतो कोमट किंवा गरम पदार्थ सेवन करावेत. थंड, फ्रिज मधले आणि शिळे पदार्थ खाणे टाळावे. त्याचबरोबर बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावेत आणि घरातील हलका आहार घेण्यावर भर द्यावा. पातळ पदार्थ कमी प्रमाणात खावेत.
४. पावसाळ्यात वातप्रकोपाचा काळ असल्याने शक्यतो दूरच्या अंतराचे प्रवास टाळावेत. पर्यायच नसेल तर विश्रांती पुरेशी घेत प्रवास करावेत म्हणजे वातप्रकोप होणार नाही.
५. पावसाळ्यात दररोज सकाळी संपूर्ण अंगाला तिळाचे तेल लावून अभ्यंग स्नान करावे. या काळात थंड पाण्याने अथवा शॉवर खाली आंघोळ करू नये. तसेच पुराच्या पाण्यात पोहण्यासारखे उपक्रम करू नयेत.
६. पावसाळ्यात घराबाहेर जाऊन आल्यानंतर स्वच्छ पाण्याने हात पाय धुवावेत आणि कोरडे करावेत. पावसात भिजले असल्यास डोके कोरड्या टॉवेलने पुसून कोरडे करावे. भिजलेले कपडे तात्काळ बदलून टाकावेत.

अशी काळजी घेत असतानाच पावसाळ्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहावी यासाठी “गिलोय” च्या गोळ्या आणि “तुलसी” च्या गोळ्या यांचा जरूर उपयोग करावा. त्याचा आरोग्य चांगले राहण्यासाठी फायदाच होईल. या गोळ्या कशा घ्यायच्या ते गोळ्यांसोबत लिहून पाठवले जाते. तुम्हाला या गोळ्या घरपोच हव्या असतील तर 7744964550 या व्हाट्स अप क्रमांकावर संपर्क साधावा.
आनंद वामन कुलकर्णी
निसर्गोपचार, योग ,आहार सल्लागार
कोल्हापूर
संपर्क क्रमांक – 7744964550