निलंग्यात शिवसेनेची “झाली तर आघाडी अन्यथा स्वतंत्र” लढण्याची तयारी…जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने
निलंगा,-(प्रतिनिधी)-
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महा विकास आघाडीचे सरकार असले तरी निलंगा शहरात सन्मानपूर्वक आघाडी आली तर शिवसेना आघाडी मधून निवडणूक लढवेल अन्यथा शिवसेनेचे स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन आज निलंगा येथील नक्षत्र मंगल कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्या प्रसंगी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी सांगितले.

आज निलंगा शहरात शिवसेना शहर शाखेच्या वतीने भवानी पेठ भागातून भव्य रॅली हुतात्मा स्मारक येथे आणण्यात आले तसेच शिवाजीनगर भागातील महिला व युवा सेना शिवसेनेच्या वतीने एक रॅली हुतात्मा स्मारकाकडे यानंतर हुतात्मा स्मारकापासून भव्य दिव्य असे मोठे मोठे झाले आली वाजत गाजत नक्षत्र मंगल कार्यालय कडे नेण्यात आली या ठिकाणी सभागृहांमध्ये रॅलीचे रूपांतर मेळाव्यात करण्यात आले या मेळाव्याला मार्गदर्शन करत असताना जिल्हाप्रमुख माने म्हणाले शिवसेनेची निलंगा शहरात मजबूत बांधणी झालेली असून यावेळेस जनतेची सेवा करण्यासाठी निलंगा नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे पालिकेतील मागच्या सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावावर शहराचा उकिरडा करून ठेवलेला आहे शहरात रस्ते आहेत की खड्डे याचा तपास घेणे अवघड झाले आहे शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा कडे लक्ष देण्यास पेक्षा सत्ताधारी आणि धार्मिक राजकारण केल्याचे जाणवते आहे यापुढे असे होऊ द्यायचे नाही शहराचा सर्वांगीण विकास करणारे नगरविकास खाते शिवसेनेकडे आहे आणि निलंग्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध शिवसेनेच्या ताब्यात नगरपालिका या शहराचा चेहरामोहरा बदलला जाईल यासाठी शिवसेनेचे खंबीर असे नगरसेवक या शहराची सेवा करण्यासाठी आपण पाठवावे विकासासाठी कसलाच नाही कमी पडू दिला जाणार नाही असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी बोलताना व्यक्त केले .

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य औसा विधानसभेतील बजरंग दादा जाधव औसा तालुका प्रमुख सतीश शिंदे निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी लातूरचे उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे , सुनिल बसपुरे, सतीश देशमुख त्रंबक स्वामी औसा चे शेखर चव्हाण किशोर जाधव रोहित गोमदे आबासाहेब पवार संजय उजळंबे शंकर लंगर मुनीर खान पठाण किशोर भोसले सहदेव कोळपे रवी भोसले निलंगा चे प्रल्हाद गोपी नंदू भाऊ लोंढे शिवाजी साळुंखे अण्णासाहेब मिरगाळे महिला आघाडी रेखाताई पुजारी दैवता सगर व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख बसवराज मंगरुळे मुरळी कर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील मुस्तफा शेख शहर प्रमुख सुनील नाईकवाडे हरीभाऊ सगरे प्रशांत वांजरवाडे दत्ता मोहोळकर पृथ्वीराज निंबाळकर राणा आर्य प्रसाद मठपती दाजीबा कांबळे माधव नाईकवाडे संतोष मोघे अजिंक्य लोंढे निखिल राजपूत राहुल बिराजदार उमेश सातपुते गुंडू गाडीवान बालाजी गाडीवान आदींनी कार्यक्रमाचा यशासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ सगरे यांनी केले.
अनेकांचा शिवसेनेत प्रवेश, तरुणाईला शिवसेनेचे आकर्षण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम करणारे व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे युवा सेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज निलंगा शिवसेनेमध्ये हे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या शुभ हस्ते शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला व यात रुपसेन शिवाजीराव जाधव यांनी एसटी कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला तर जमील जलील शेख हुसेन शेख गौस बागवान वाजिद शेख सतीश वाघे धनंजय सावळसुरे कैकाडी समाजाचे जिल्हा संघटक इंद्रजीत जाधव मदार सय्यद इनामवाडी येथून राहुल दगडू साहेब नाईकवाडे लहू शिवाजीराव मोघे माधव गोपाळराव नाईकवाडे तानाजी बिभीषण नेलवाडे श्रीमंत पवार अजित पवार बालाजी मोहनराव गाडीवान यांनी तर शिवाजीनगर भागातील दीपक पवार माळी गल्ली येथील अमोल कोळकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अजय बहुत करण बहुत राहुल बहुत विष्णू कदम कृष्णा पवार आशा शेकडो कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यासह शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी यथोचित स्वागत करून त्यांचा प्रवेश घेतला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांचा यथोचित सन्मान कायम ठेवला जाईल असे अभिवचन यावेळी देण्यात आले प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात युवकांचा ओढा शिवसेनेकडे वाढला असून युवकासाठी शिवसेना आकर्षण ठरत आहे.