19.3 C
Pune
Sunday, December 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीयआर्ट ऑफ लिव्हिंगच्या उपक्रमास लातूरात चांगला प्रतिसाद

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या उपक्रमास लातूरात चांगला प्रतिसाद


जागतिक ध्यान दिवस


४२ शाळांमधील ४५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

लातूर; ( माध्यम वृत्तसेवा )- आर्ट ऑफ लिव्हिंग या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने व संयुक्त राष्ट्र संघाच्या मान्यतेने आज देशभर २१ डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या उपक्रमास लातूरमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला.


लातूर शहरातील ४२ शाळांमधील ४५ हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमास सहभाग नोंदवला, असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने देण्यात आली. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्थानिक प्रशिक्षकांच्या वतीने आज ४२ शाळांमध्ये जाऊन जागतिक ध्यान दिवस हा उपक्रम राबवण्यात आला. सकाळी ७ ते १०या वेळेमध्ये लातूर शहरातील विविध शाळांमध्ये जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी १५ ते २० मिनिटे विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा केली. यावेळी ध्यान दिवसाचे महत्त्व विशद करण्यात आले .ध्यान धारणा का करावी ? कशासाठी करावी? ध्यानधारणा नियमित केल्याने काय फायदे होतात ? याची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्याचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांकडून करूवून घेण्यात आले.


आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते श्री श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या पुढाकारातून 21 डिसेंबर हा दिवस देशभर जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा करण्यात आला. यंदाचे हे पहिलेच वर्ष होते परंतु पहिल्याच वर्षी या उपक्रमात चांगला प्रतिसाद मिळाला. ध्यानधारणा केल्याने शरीर मजबूत होते, मन प्रफुल्लित होते ,बुद्धी तीक्ष्ण होते, व्यवहार चांगल्या पद्धतीने केला जातो ,मानसिक व शारीरिक ताणतणाव कमी होऊन मन प्रसन्न राहते आणि ध्यानधारणा ही ईश्वराला प्राप्त करण्यासाठी केली जाते ‌‌.
ध्यानधारणा ही केवळ आपल्यासाठीच नव्हे तर देशासाठी ,समाजासाठी देखील उपयोगी ठरत असते. यंदाच्या वर्षापासून २१ डिसेंबर या दिवशी दरवर्षी जगभरात ध्यान दिवस म्हणून राबवण्यात येणार आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था वैश्विक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी १८० पेक्षाही जास्त देशांमध्ये कार्यरत असून ,लोकांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजा पूर्ण करून सामाजिक बांधिलकी वाढीस लागण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.
हा उपक्रम राबवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे आनंद रेड्डी,बालाजी साळुंके ,तिरुपती मलशेट्टे ,सौरभ साळुंके,सुलन खांडेकर ,शोभागायकवाड ,भाग्यश्री घारूळे, कीर्ती स्वामी,सूरज बाजुळगे,राकेश पाठक आदींनी परिश्रम घेऊन विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]