मुंबई,; दि.९(प्रतिनिधी)-
इंडियन मेडिकल असोसिएशन ,मुंबई शाखा दरवर्षी व्ही एच साळसकर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करीत असते.या वर्षीच्या स्पर्धेत डॉ. सचिन पाथरकर, सहयोगी प्राध्यापक जीव रसायन शास्त्र विभाग नायर हॉस्पिटल यांनी
पहिला क्रमांक पटकावला. ते “सेंद्रिय शेती: भ्रम की वास्तव” या विषयावर बोलले.
दुसरा क्रमांक डॉ. कश्यप दक्षिणी यांनी तर तिसरा क्रमांक डॉ. अंजली पाटील, नामांकित कॅन्सर शल्यचिकित्सक यांनी पटकावला. बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम तसेच फिरते सन्मान चिन्ह असे आहे .
नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत एकूण ५ स्पर्धक होते आणि साधारणतः ४०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते.
प्रमुख उपस्थितांमध्ये नॅशनल मेडिकल कौन्सिलचे सदस्य तथा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल चे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे आणि इंडियन मेडिकल असोसिएशन ,मुंबई शाखेचे अध्यक्ष
डॉ. जितेश मेहता उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश बोराना, इंडियन मेडिकल असोसिएशन हेड क्वार्टर्स दिल्ली चे माजी उपाध्यक्ष डॉ. विजय पंजाबी व इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई शाखेचे सचिव
डॉ. गिरीश लाड होते.