26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडीआय आय बी ची गरुडझेप

आय आय बी ची गरुडझेप

पहिल्याच यादीत आयआयबीच्या तब्बल 1021 विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेश
……………………………………….
यावर्षी आयआयबी चे 1600 पेक्षा जास्त विद्यार्थी MBBS साठी पात्र ठरती

………………………………….
लातूर/नांदेड :

मागील तब्बल 22 वर्षांपासून बायोलॉजी विषयात आपले वर्चस्व सिद्ध करणार्‍या आयआयबीने बायोलॉजी विषयासोबतच यंदा फिजिक्स आणि केमिस्ट्री पहिलेच वर्ष असून आयआयबीच्या विद्यार्थ्यांनी नीट-२०२१ मध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या मेडीकल प्रवेशाच्या पहिल्या यादीत एक दोन नव्हे तर २० पेक्षा अधिक आयआयबीयन्स देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशास पात्र ठरले याशिवाय वैद्यकीय प्रवेशाच्या सर्व याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत आयआयबीचे 1600 पेक्षा जास्त विद्यार्थी MBBS प्रवेशासाठी पात्र ठरतील तसेच मेडीकल प्रवेशासाठी यावर्षी राज्यातून सर्वात जास्त विद्यार्थी हे आयआयबीचेच असणार असा विश्वास संस्थापकीय संचालक श्री दशरथ पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

नीट-2021 च्या निकालात 720 गुणांपैकी 700 पेक्षा अधिक गुण असणारे 3 विद्यार्थी, 600 पेक्षा अधिक गुण घेणारे 149 विद्यार्थी आणि 500 पेक्षा अधिक गुण मिळविणारे तब्बल 611 विद्यार्थी हे आयआयबीचे आहेत.. याशिवाय आयआयबी ने केलेल्या घोषणेप्रमाणे बायोलॉजी विषयात 360 पैकी 360 गुण घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 3 लाख 60 हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलून त्यांना मोठा आर्थिक आधार देण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे.

नीट-2021 मध्ये 33 विद्यार्थ्यांनी बायोलॉजी मध्ये 360 पैकी 360 गुण मिळवले या ऐतिहासिक कामगिरीसाठी आयआयबीची बेस्ट ईन्सिटीट्यूट फॉर मेडीकल एंट्रन्स् प्रिप्रेरेशन म्हणून वर्ल्ड रेकार्ड ऑफ इंडीया बुक मध्ये नोंद झाली आहे त्यासंदर्भात 7 डिसेंबर 2021 रोजी त्यांना अधिकृत प्रमाणपत्र वर्ल्ड रेकार्ड ऑफ इंडीया बुकचे महाराष्ट्राचे पंच संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर स्पेश अ‍ॅडज्युडिकेटर, महाराष्ट्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नांदेड व लातूरकरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. हा निकाल लातूर किंवा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रासह देशातील सर्वात मोठा ठरला असून आयआयबीने त्यांच्या सखोल व परिपूर्ण तयारीचा पॅटर्न हा रियल पॅटर्न असल्याचे निकांलावरुन सिद्ध केले आहे.

यंदा उच्चांक प्रस्थापित होणार


मेडीकल प्रवेशाचा यावर्षी नवीन उच्चांक प्रस्थापित होणार..
नीट-2021 मध्ये आयआयबीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून इतिहास रचला आहे. यावर्षी नुकत्याच जाहीर मेडीकल प्रवेशाच्या पहिल्याच पात्रता यादीत मेडीकल शिक्षणासाठी देशातील अग्रगण्य असलेल्या नागपूर, भोपाळ, दिल्ली, रायपूर, ऋषिकेश, हैद्राबाद आदी एम्स् या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून त्याचबरोबर दिल्ली येथील एमएएमसी आणि वाराणसी येथील बिएचयू येथेही आयआयबी चे विद्यार्थी पोहचले आहेत ,यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही या अव्वल कॉलेजातील प्रवेशाबरोबरच यावर्षी आयआयबी मेडीकल प्रवेशाचा आपला गतवर्षीचा उच्चांक निश्‍चितपणे मोडीत काढून नवीन उच्चांक प्रस्थापित करणार यात दुमत नाही तरी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्याच्या भविष्यातील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

अनिरुद्ध डाखरे (AIIMS Delhi)
आयआयबीमध्ये माझी दोन वर्ष परिपूर्ण तयारी झाल्यामुळेच मी हे यश संपादन करु शकलो.
आयआयबीची मला 11 वी आणि 12 वी या दोन्ही वर्षात 100 टक्के स्कॉलरशीप मिळाली होती. आयआयबी होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना नेहमीची मदत करते. त्यामुळे प्रत्येकजण एम्समधून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहू शकतो.


………………………………………….
श्रेेया आरु (AIIMS Delhi)
आयआयबीच्या बेस्ट मॅनेजमेंट परिपूर्ण टिचींग आणि परफेक्ट नोटस्मुळेच मला हे यश मिळू शकले. आयआयबीच्या सर्व शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत माझ्या चुका लक्षात आणून दिल्या व त्यात सुधारणा करत गेल्यामुळे माझा स्कोर वाढत गेला आणि आज मी एम्स दिल्ली येथून डॉक्टर बनण्याचे माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरवत आहे. याचा मला व माझ्या आईवडीलांना खूप अभिमान वाटतो.
………………………………………….
अथर्व वट्टमवार (MAMC Delhi)
मला माझ्या नीटच्या संपूर्ण प्रवासात टीम आयआयबीच्या पूर्ण टीमचा खूप मोठा वाटा आहे. नीटमध्ये मला 720 पैकी 705 मार्क्स मिळाले असून मी मौलाना आझाद मेडीकल कॉलेज दिल्लीमधून डॉक्टर बनत असल्याचा मला आणि माझ्या कुटूंबाला खूप आनंद होत असून त्याचे संपूर्ण श्रेय मी टीम आयआयबीला देतो.
धन्यवाद आयआयबी

………………………………………….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]