- कंपनीने भांडवलाच्या सुरक्षिततेसह हमीपूर्ण फायदे देणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीत १५८ टक्क्यांच्या वाढीची नोंद केली आहे
- यामधून हमीपूर्ण लाभदायी उत्पादनांसाठी ग्राहकांची वाढती पसंती दिसून येते
लातूर :आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष २०२० ते आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत आपल्या हमीपूर्ण बचत उत्पादन विभागात १५८ टक्क्यांच्या वाढीची नोंद केली आहे. या वाढीमधून ग्राहक हमीपूर्ण फायदे देणाऱ्या उत्पादनांना अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.
शेअर बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे ग्राहक हमीपूर्ण फायदे देणाऱ्या उत्पादनांना अधिक प्राधान्य देत आहेत. हमीपूर्ण लाभदायी उत्पादने भांडवलाच्या सुरक्षिततेची खात्री देण्यासह स्थिर परतावा देतात. उत्पादनांची ही श्रेणी दुय्यम उत्पन्न स्रोत निर्माण करण्याकरिता आर्थिक स्थिरता व संभाव्य मार्ग देते.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष श्री. विनोद एच म्हणाले, ”आमच्या निदर्शनास आले आहे की, अनेक ग्राहक उत्पन्नाच्या पर्यायी स्रोताचा शोध घेत आहेत. आमची काही ग्राहक-अनुकूल उत्पादने जसे आयसीआयसीआय प्रू गॅरण्टीड इन्कम फॉर टूमारो, आयसीआयसीआय प्रू गोल्ड आणि आयसीआयसीआय प्रू सुख समृद्धी ग्राहकांना त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक ध्येयांचे नियोजन करण्यास सक्षम करतात. आमची काही उत्पादने ग्राहकांना पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षापासून पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याचा पर्याय देखील देतात. काही उत्पादनांनी प्रदान केलेले नाविन्यपूर्ण सेव्हिंग्ज वॉलेट वैशिष्ट्य वापरून उत्पन्न जमा करता येऊ शकते आणि त्यानंतर हे उत्पन्न भविष्यातील प्रीमियम्स भरण्यासाठी वापरता येऊ शकते किंवा एकरकमी रक्कम म्हणून घेता येऊ शकते. मॅच्युरिटी बेनीफिट ग्राहकांना त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक ध्येयांसाठी उत्तमप्रकारे नियोजन करण्यास मदत करते.
विविध ग्राहकवर्गांना विमा सुलभ उपलब्ध होण्याकरिता कंपनीने ४डी फ्रेमवर्क तयार केले आहे. हा फ्रेमवर्क आहे डेटा अॅनालिटिक्स, डायव्हर्सिफाइड प्रपोझिशन्स, डिजिटलायझेशन आणि डेप्थ इन पार्टनरशीप्स. डेटा अॅनालिटिक्स सानुकूल जीवन विमा उत्पादने निर्माण करण्यास मदत करते, तर डायव्हर्सिफाइड प्रपोझिशन्स उत्पादन पोर्टफोलिओमध्ये वाढ करते, ज्यामुळे कंपनीला अधिकाधिक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करता येते. डिजिटलायझेशन ग्राहकांना पेपरलेस व्यवहाराची सुविधा देते आणि सेल्फ-सर्विस पर्यायांसह सक्षम करते. डेप्थ इन डिस्ट्रिब्युशन ग्राहकांमध्ये जीवन विम्याबाबत उत्तमप्रकारे जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी सहयोग प्रबळ करते. याचा ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार योग्य उत्पादनाची विक्री करण्याचा मुख्य उद्देश आहे.”