~ ई-स्कुटर्स ग्राहकांच्या घरी पोचत्या करण्यासाठी उपक्रम ~
मुंबई, २ मे २०२२: भारतातील एक सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली ही इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आयवूमी एनर्जी (iVOOMi Energy) देशातील दुसऱ्या क्रमांकाची डी२सी अर्थात थेट ग्राहकांना विक्री करणारी कंपनी बनण्यासाठी सज्ज आहे. भारतातील सर्वात आघाडीच्या ई-स्कूटर ब्रँडनंतर डी२सीच्या यादीत दुसरा क्रमांक आता आयवूमी एनर्जीचा असणार आहे. आयवूमी एनर्जीचे ऑनलाईन सेल्स पोर्टल ४ जून २०२२ रोजी सुरु करण्याची सर्व जय्यत तयारी झालेली आहे. देशभरात उत्पादनांच्या विक्रीत वाढ आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी कंपनी हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत आहे. या मॉडेलअंतर्गत कोणताही अडथळा येणार नाही अशा, अतिशय सुरळीत आणि खर्चात बचत करू शकतील अशा मोबिलिटी सुविधा पुरवण्यासाठी पिकअप सुविधेसह उत्पादने थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
आयवूमी एनर्जीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नुकत्याच सादर करण्यात आलेल्या ‘आयवूमी एससह कंपनीच्या सर्व नवीन मॉडेल्सचा समावेश केला जाईल आणि येत्या काळातील इतर प्रीमियम मॉडेल्स देखील इथे हळूहळू दाखल होतील. आयवूमीची उत्पादने आयसीएटीने प्रमाणित केलेली व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नोंदणीकृत केलेली असतात.
https://ivoomienergy.com/ या ऑनलाईन पोर्टलमुळे आयवूमीची उत्पादने आधीपेक्षा अधिक जास्त सहजपणे उपलब्ध होतील. याठिकाणी ग्राहकांना आयवूमीच्या सर्व उत्पादनांची माहिती घेता येईल, आपल्याला हव्या असलेल्या उत्पादनांची खरेदी करण्याची प्रक्रिया ग्राहकांसाठी आधीपेक्षा जास्त सहजसोपी व माहितीपूर्ण होईल. जूनच्या मध्यापासून उत्पादनांची डिलिव्हरी वेळेवर केली जाईल असे वचन देखील कंपनीने दिले आहे.
ऑनलाईन उद्योगक्षेत्रात बाजारपेठेतील लक्षणीय हिस्सेदारी मिळवण्याच्या आणि ब्रँड व ग्राहक यांच्या दरम्यानची पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने कंपनीने हे पाऊल उचलले आहे. उत्पादनांच्या डिलिव्हरीच्या संदर्भात प्रीमियम आणि समाधानकारक साहाय्य पुरवून आपल्या ग्राहकांना ही कंपनी अतिशय अनोखा अनुभव मिळवून देते. भारतात उभारण्यात आलेला इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड आयवूमी एनर्जी पुणे आणि नागपूरमध्ये आपल्या ऑनलाईन विक्रीची सुरुवात करत असून त्यापाठोपाठ चॅनेल पार्टनर्समार्फत भारतभरात वितरण केले जाईल.
आयवूमी एनर्जीचे एमडी आणि सह-संस्थापक श्री. सुनील बन्सल म्हणाले, “डी२सी मॉडेलमार्फत आयवूमी एस१ च्या विक्रीच्या पहिल्या लाटेसाठी आमच्या योजनांची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठांमध्ये जागतिक पातळीवर आघाडीचे स्थान मिळवण्याचे भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही योगदान देत आहोत. आयवूमी एनर्जी ही देशातील जास्तीत जास्त लोकांसाठी सर्वाधिक विश्वसनीय, स्वदेशी इलेक्ट्रिक वाहन कंपनी बनावी यासाठी आम्ही अथक प्रयत्नशील आहोत.”
ते पुढे म्हणाले, “देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना आमच्या उत्पादनांचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु करत आहोत, ज्यामुळे आम्हाला अधिक मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचता येणार आहे. आम्ही असे मानतो की, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर इलेक्ट्रिक वाहन उद्योगक्षेत्राचे भवितव्य अतिशय आशादायी आहे. या विभागात भरपूर संधी आहेत, ज्यांना ऑफलाईन चॅनेल सहजपणे, जवळपास उपलब्ध नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला आमची ऑनलाईन उपस्थिती वाढवायची आहे.”