आयटीआयच्या माध्यमातून नोकरी
मिळविण्यासाठी आपला प्रवेश आजच निश्चित करा/
आयटीआय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रवेश घ्यावा
– अजितसिंह पाटील कव्हेकर
लातूर दि.24/07/2021
महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये आयटीआय प्रवेश घेणार्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आर्थिक (ई.डब्ल्यु.एस.)दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी स्कॉलरशीप लागू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. स्वामी विवेकानंद आयटीआय, एमआयडीसी, लातूर येथील जेएसपीएम शैक्षणिक संकूल येथे गेल्या वर्षापासून इलेक्ट्रीशियन, वायरमन, फिटर व डी.टी.पी. आदी कोर्सेस सुरूवात करण्यात आलेले असून हे कोर्स 2 वर्षाचे व डी.टी.पी.हा एक वर्षाचा कोर्स आहे. या कोर्सच्या प्रवेशासाठी 10 वी पास व वायरमनसाठी 10 वी नापास असले तरीही प्रवेश मिळणार आहे. या टे्रडसाठी प्रत्येकी 20 जागा आहेत. प्रवेशाच्या प्रमाणात अत्यंत कमी जागा आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आयटीआय, एम.आय.डी.सी.लातूर येथे प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना आय.टी.आय.चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी प्लेसमेंट सेल स्थापन करण्यात आला असून आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या कंपनीमध्ये जागा उपलब्ध राहणार आहेत. परंतु आयटीआय करणार्या विद्यार्थी संख्या पाहून त्यांना तात्काळ कपंनीमध्ये नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी कॅम्पस मुलाखतीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यातच लातूर येथे बोगी कारखाना झाल्यामुळे आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ चांगली संधी मिळणार आहे. संस्थेच्या कॅम्पसमध्ये ज्यांना हॉस्टेल सुविधा पाहिजे असेल त्यांच्यासाठी राहणे व मेस सुविधाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे ईच्छुक व गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन जेएसपीएमचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
———————————————————