लातूर, दि. ०४ :
इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए,लातूर शाखेच्या वर्ष २०२२ – २३ साठी अध्यक्ष म्हणून येथील विख्यात स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांची तर सचिव पदी डॉ. मुकुंद भिसे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच वर्ष २०२३ -२४ साठी प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून डॉ. अनिल राठी यांची निवड केली गेली आहे. आयएमएच्या वतीने सातत्याने आरोग्य विषयक शिबिरे, आरोग्य विषयक जनजागृतीसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. मागच्या दोन वर्षाच्या कोरोना काळातही आयएमए च्या लातूर शाखेचे कार्य अत्यंत उल्लेखनिय राहिले आहे. कोरोना कालावधीत तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्णसेवेस अग्रक्रम देऊन स्वास्थ सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे दाखवून दिले आहे. आयएमएच्या वर्ष २०२२ -२३ साठीच्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
आयएमएची नूतन कार्यकारिणी अशी आहे – अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकुंद भिसे, प्रेसिडेंट इलेक्ट २०२३ – २४ डॉ. अनिल राठी, उपाध्यक्ष डॉ. उमेश कानडे, डॉ. अजय पुनपाळे , डॉ. चांद पटेल,डॉ.हनुमंत किनीकर , डॉ. संतोष डोपे, सहसचिव डॉ.अनुजा कुलकर्णी, डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. ओम भोसले, डॉ. ज्योती सूळ, डॉ. राखी सारडा, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर फत्तेपूरकर. लातूर आयएमए शाखेला प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचा इतिहास असून मागील काळात निवडले गेलेले डाॅ गोपाळराव पाटील, डॉ.अशोक कुकडे, डॉ. मन्मथ भातांब्रे, डॉ. राम पाटील, डॉ. एस.एच. भट्टड, डॉ. सरिता मंत्री, डॉ. सोपान जटाळ , डॉ.हंसराज बाहेती, डॉ.डी.एन. चिंते, , डॉ.संजय वारद , डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. दीपक गुगळे,डाॅ अजय जाधव, विश्वास कुलकर्णी ,डॉ. रमेश भराटे , डाॅ सुरेखा काळे हे सर्व सदस्य आयएमएचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच डाॅ. सूर्यकांत निसाले ,डॉ. नवाब जमादार, डॉ. गिरीश मैंदरकर, डॉ. संतोष कवठाळे , डॉ.अशोक गाणू , डॉ. तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएमएने अत्यंत चांगले कार्य केले होते, हे विशेष.
आयएमएच्या वतीने आगामी काळात झोपडपट्टी, तांड्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांचा परिसर दत्तक घेणे, युवकांमधील व्यसनाधिनता कमी करणे, महाविद्यालयीन मुला – मुलींना आरोग्यविषयक शिक्षण, माहिती देणे, आरोग्यविषयक विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे यांनी सांगितले. ————————-डॉ.अर्चना शर्मांच्या आत्महत्येप्रकरणी आयएमएचा कँडल मार्च राजस्थानमधील डॉ.अर्चना शर्मा यांच्या कथित आत्महत्येप्रकरणी आयएमएच्या लातूर शाखेच्या वतीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – हॉस्पिटल ते गांधी चौकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. डॉ. अर्चना शर्मा यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तीन आरोपी फरार आहेत. त्यांनाही लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, भविष्यात डॉक्टरांवर अशा प्रकारची वेळ येऊ देता कामा नये यासाठी हा कँडल मार्च काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही डॉक्टरबाबत डॉक्टर्स बोर्डाचा अहवाल येईपर्यंत डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ नये,अशी मागणीही आयएमएच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकुंद भिसे, डॉ. डी.एन. चिंते, डॉ. वैशाली दाताळ , डॉ. रमेश भराटे यांनी उपस्थित १५० हुन अधिक डॉक्टर्सना मार्गदर्शन केले.