लातूरकर धावले आरोग्यासाठी, समानतेसाठी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आयएमएथॉन २०२४ मॅरॅथॉनला आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : दि.३( वृत्तसेवा )- इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर तर्फे आयोजित आयएमएथॉन लातूर २०२४ मॅरेथॉन स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद लाभला. ३ किलोमीटर, ५ किलोमीटर, १० किलोमीटर व २१ किलोमीटरसाठी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १५०० पेक्षा जास्त धावपटूंनी उत्साहाने व हिरीरीने सहभाग नोंदविला.
आयएमए लातूरतर्फे आयएमएथॉन लातूर २०२४ च्या चवथ्या आवृत्तीची जय्यत तयारी करण्यात आली होती. आयएमए लातूरच्या वतीने ह्या मॅरेथॉनची थीम Empower Her, Elevate All, Run for Equality in every Step! अर्थात तिला सक्षम करा, सर्वांना उन्नत करा, प्रत्येक टप्प्यावर समानतेसाठी धावा! अशी ठेवण्यात आलेली होती. आठ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीचे सक्षमीकरण आणि समानता अशी थीम आयोजकांनी विचारपूर्वक निवडलेली होती.
२१ किलोमीटर व १० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे व स्पर्धेचे मुख्य प्रायोजक लातूर अर्बन को-ऑ. बँक लि. , लातूरचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांच्या हस्ते करण्यात आली. बिडवे लॉन्स, औसा रोड येथून सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये २१ किलोमीटर साठी २४० व दहा किलोमीटर साठी ६५० धावपटूंनी सहभाग नोंदवला. ५ किलोमीटर व ३ किलोमीटर च्या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व मॅरेथॉन स्पर्धेचे सहप्रायोजक असलेले सुभाष कासले, क्वॉलिटेक इलेव्हेटर्स, भारती व गित्ते ग्रुपचे धर्मवीर भारती व . नागनाथ गित्ते,
कौशल्या अकॅडमी लातूरचे पाटील , कीर्ती गोल्डचे भुतडा, सनरिच एक्वाचे मुंदडा, हॉटेल सिटी सेंटरचे नंदकिशोर अग्रवाल, हॉटेल भोजचे मिनू अग्रवाल, बिडवे लॉन्सचे गणेश बिडवे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व धावपटूंनी स्पर्धा सुरू होण्याअगोदर एकत्र येऊन अंकिता जोधवानी यांच्या नेतृत्वाखाली झुंबा करत वॉर्म अप केला. त्यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साह संचारला. फ्लॅग ऑफ झाल्यानंतर चढाओढीने धावत लवकरात लवकर स्पर्धा पूर्ण करण्याची लगबग दिसून येत होती. मॅरेथॉनच्या मार्गावर आयोजकांनी चोख तयारी ठेवली होती. मॅरेथॉनच्या मार्गावर सहा ठिकाणी हायड्रेशन पॉईंट जेथे पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रिंक व स्नॅक्सची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी नेमण्यात आलेले स्वयंसेवक सर्व धावपटूंचा उत्साह वाढवत होते तसेच मार्गातील ढोल ताशा व लेझीम पथक, बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, पोद्दार स्कूल, माउंट लिटेरा झी स्कूल, जे एस पी एम स्वामी विवेकानंद विद्यालय येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या बँड पथकांनी देखील मार्गामध्ये धावपटूंना ऊर्जा देत त्यांचा उत्साह वाढवला.
फिनिशिंग लाइन जवळ फोटो काढताना व मेडल घेताना सर्व धावपटूंच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद ओसंडून वाहत होता. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ह्या प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करून आयएमएथॉन लातूर २०२४ च्या यशस्वीतेसाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण सोहळ्यावेळी डिजेच्या तालावर व टाळ्या वाजवून विजेत्यांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन समीर बजाज व डॉ. आशिष चेपुरे यांनी केले.खुल्या गटामध्ये ३ किमी स्पर्धेमध्ये मुलांमध्ये आर्यन नागरगोजे, अविनाश कांडगिरे , अथर्व अर्जुने व मुलींमध्ये जननी शिंदे, सानवी वाघमारे, आणि कैरा नावंदर यांनी अनुक्रमे प्रथम दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. साठ वर्षांवरील स्पर्धकांमध्ये पुरुष गटात लाल मोहम्मद उजेडे, सुरेश भुतडा, सुभाष मल्लाडे व स्त्री गटामध्ये कुसुम पाटील, डॉक्टर सरिता मंत्री व शकुंतला रेड्डी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावला. पाच किलोमीटर स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये पुरुषांमध्ये शुभम भोसले, आदित्य पोटले, आरुष यादव व महिला गटामध्ये राजनंदिनी सोमवंशी, ऋतुजा सोनी, आदिती थोरमोठे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
पाच किलोमीटर डॉक्टर गटामध्ये पुरुषांमध्ये पार्थ खानापूरकर, डॉक्टर राहुल सूळ, डॉक्टर दीपक पाटील यांनी तर स्त्री गटामध्ये अनन्या पांचाळ, डॉक्टर शीतल अभंगे व तनिष्का पाटील यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
दहा किलोमीटर खुल्या गटामध्ये पुरुषांच्या गटात निवृत्ती गुडेवार रितेश धोत्रे व गौरव कांबळे व स्त्री गटामध्ये दिव्या राठोड, निकिता म्हात्रे व श्रावणी जगताप यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. दहा किलोमीटर डॉक्टर्स व कुटुंबीय या गटामध्ये डॉक्टर मुरलीधर जाधव, डॉ. अमृत शिवडे, डॉ. सचिन बाबळसुरे तर महिला गटामध्ये डॉ. वैशाली कुलकर्णी डॉ. क्रांती साबदे, डॉ. रचना जाजू यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
२१ किलोमीटर च्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये खरोखर चुरस बघायला मिळाली. खुला गटातून गणेश सुरवसे वैभव कांबळे व गंगाधर सोमवंशी व स्त्री गटातून पुष्पा राठोड, परिमला बाबर व राणी लोया यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. २१ किलोमीटर डॉक्टर्स गटामधून पुरुषांमध्ये डॉ. दिनकर बिरादार, डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. महेश कदम तर महिला गटामधून डॉ. वृषाली बंडगर, डॉ. वैशाली इंगोले, डॉ. रचना बियाणी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. २१ किमी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १२ हजार रुपये, द्वितीय ८ हजार, तृतीय ६ हजार रुपये असे जाहीर करण्यात आले. १० किमी. अंतरासाठी प्रथम पारितोषिक ७ हजार, द्वितीय ५ हजार तर तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये जाहीर करण्यात आले. स्पर्धकांना सुंदर असे मेडल्स, सर्टिफिकेट व चांगले टी-शर्ट मिळाल्यामुळे सर्व धावपटूंचा उत्साह व ऊर्जा वाखाणण्यासारखी होती. धावून आल्यानंतर रिकव्हरी साठी फिजिओथेरपी ची व्यवस्था करण्यात आली होती व फर्स्ट एड किट आणि पेन किलर स्प्रे चा वापर करून धावपटूंचा थकवा दूर करण्यात डॉ. पल्लवीं जाधव, डॉ. वीरेंद्र मेश्राम व डॉ. गौरव भटनागर यांच्या नेतृत्वाखाली फिजिओथेरपी टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. चवदार अशा अल्पोपहाराची सोय आयोजकांकडून करण्यात आल्यामुळे सर्व धावपटूंनी आनंद व समाधान व्यक्त केले.
स्पर्धेच्या मार्गावर वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा, पोलीस यंत्रणा, महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज होती. पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय साधत धावपटूंना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली.
आयएमएथॉन लातूर २०२४ च्या यशस्वीतेसाठी लातूरचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपुरे, वूमेन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. प्रिती बादाडे, सचिव डॉ. प्रियंका राठोड, उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. हर्षवर्धन राऊत,, कोषाध्यक्ष डॉ. अर्जुन मंदाडे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. आरती झंवर, डॉ. चांद पटेल, डॉ. ब्रिजमोहन झंवर, क्रीडा समितीचे सदस्य डॉ. अजय जाधव, डॉ .चेतन सारडा, डॉ. विक्रम सारडा, डॉ. शितल ठाकूर – टीके, डॉ. सतीश हंडरगुळे, डॉ. चंद्रशेखर अष्टेकर , डॉ. ज्योती सूळ, डॉ. केतकी चवंडा यांसह सर्व आयएमए पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
—————————–