39.4 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeशैक्षणिक'आयआयबी 'च्या विजयी भव कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद

‘आयआयबी ‘च्या विजयी भव कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद

आयआयबी चा “विजयी भव:” कार्यक्रम प्रचंड प्रतिसादाने संपन्न…!
“विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल – प्रा. नितीन बानूगडे पाटील

लातूर –( माध्यम वृत्तसेवा)–विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा पाया रचणाऱ्या आयआयबी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट च्या वतीने आयोजित “विजयी भव:” हा प्रेरणादायी कार्यक्रम प्रचंड उत्साहाने पार पडला. विद्यार्थ्यांना ताणतणावमुक्त शिक्षणाची प्रेरणा देण्यासाठी आणि एमबीबीएस प्रवेशाच्या तयारीसाठी दिशा दाखवण्यासाठी आयआयबीने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करतांना प्रबोधनकार व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी “विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल असे प्रतिपादन उपस्थित विद्यार्थ्यांसमोर केले.

आयआयबी: एमबीबीएस प्रवेशासाठी विश्वासार्ह मार्गदर्शक – आयआयबी ही संस्था विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणातील यशाचा पाया घालण्यासाठी ओळखली जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे मार्गदर्शन, आणि त्यांच्या यशासाठी आवश्यक सर्व प्रकारचे शैक्षणिक सहाय्य पुरवणे यासाठी आयआयबी प्रसिद्ध आहे. प्रा. नितीन बानूगडे पाटील यांनी या संस्थेला “एमबीबीएस प्रवेशाचे गुगल” असे उपमित करून याचे महत्त्व अधोरेखित केले.

विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल !
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. बानूगडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना एक मंत्र दिला: “विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल. आयआयबी तुमच्या सदैव पाठीशी आहे.” त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उत्साहाचा संचार केला.आणि “विजयी भव:” या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, प्रेरणा आणि यशस्वी भविष्याची दिशा मिळाली आहे. आयआयबीच्या या कार्याचा एकूणच शैक्षणिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होत आहे.

नीट २०२४ च्या निकालातही आयआयबी अव्वल!
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नीट २०२४ च्या निकालात आयआयबी ने आपला उच्चांक कायम राखला असून यावर्षी आयआयबीच्या राख सिद्धांत महादेव ७१०, येसणे ओम सुधीर ७००, गायकवाड हृषीकेश नामदेव ७००, भगत प्राजक्ता हिरामण ७००, सय्यद अब्दुल रहमान इरफान अली ६९७, क्षीरसागर अथर्व अनिल ६९६, पाटील रिया ललित ६९६, मिरजे सानिया बापुसो ६९५, सत्त्वधर महेश प्रसादराव ६९५, जोशी हर्ष संजयकुमार ६९५, पिंगळे अर्चित मनीष ६९१, बोलशेट्टे प्रतीक्षा रविकुमार ६९०, इंगोले अनुष्का गोविंद ६९०, निमगडे अर्हत सिद्धार्थ ६९० अशा एकूण १४ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ६९०पेक्षा जास्त गुण मिळवले आहे

—————————————————————-
आयआयबी कडून फास्ट २०२५ ची घोषणा २५०० विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप!
दरवर्षी आयआयबी कडून फास्ट परीक्षा घेतली जाते, दहावीतून अकरावीमध्ये आणि अकरावी तून बारावी आमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट परीक्षा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा राजमार्ग. विद्यार्थी या परीक्षेसाठी विशेष तयारी तर करतातच मागील काही वर्षांपासून या परीक्षेला उत्सवाचे स्वरूप आले आहे. या परीक्षेचा मुख्य उदेश आर्थिक विषमता दूर करत विद्यर्थ्याना गुणवत्तेच्या अधरावर स्पर्धा निर्माण करून देणे आणि गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडणे हा आहे. आयआयबी च्या इम्पवारिंग नेशन थ्रू एजुकेशन या घोष वाक्याला साजेसा हा उपक्रम आयआयबी कडून दरवर्षी राबवला जातो.


यावर्षी इयत्ता बारावी मध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी १२ जानेवारी २०२५ रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तर दहावीतून अकरावी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १९ जानेवारी २०२५ रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नोंदणी आवश्यक असून www.iibedu.com या संकेतस्थळावर लॉग ऑन करून अथवा आयआयबी च्या ७३०४७३०७३०, ७३०४५६७५६७ या हेल्पलाईन वर कॉल करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]