तब्बल ३००० नीट रिपीटर्स विद्यार्थ्यांना पीसीबी साठी स्कॉलरशिप‘
येत्या १६ ऑगस्ट २०२२ पासून रिपीटर्स साठीच्या नवीन बॅचला सुरूवात..
नांदेड , (प्रतिनिधी)
देश पातळीवर एमबीबीएस प्रवेश पूर्व परीक्षेसाठी कौतुकास पात्र ठरलेल्या ‘आयआयबी ने नीट-२०२३ साठी एक प्रयत्न करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयआयबी’ ‘फास्ट’ म्हणजेच फ्रि ॲडमिशन सलेक्शन टेस्ट ची घोषणा केली असून येत्या ७ ऑगस्ट रोजी ऑनलाईन व त्यातून गुणानुक्रमे पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने ९ ऑगस्ट, मगंळवारी रोजी नांदेड,लातूर व पूणे आदी तिन्ही शाखांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे ..
यावर्षी पार पडलेली नीट-२०२२ ही परिक्षा ही कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमाचे फलित होय परंतु अनेक सक्षम विद्यार्थीही आपल्या क्षमतेस साजेशी कामगिरी नुकत्याच पार पडलेल्या नीट मध्ये करू शकले नाहीत अशी भावना अनेक विद्यार्थी व पालकांनी टिम आयआयबीशी बोलून व्यक्त केली व एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन नीट-रिपीट करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी व पालकांच्या आग्रहास्तव आयआयबी च्या वतीने ‘आयआयबी फास्ट’ ही अभिनव योजना प्रथमच रिपीटर्स साठी जाहीर करण्यात आली आहे .
नीट – २०२३ व्दारे एमबीबीएस प्रवेशासाठी पुन्हा तयारीस ईच्छूक विद्यार्थ्यांसाठी आयआयबी फास्ट नुसार ३००० विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे स्कॉलरशिप सोबतच रिपीटर्स साठी ‘आयआयबी’ ‘फास्ट’ ही योजना नांदेड ,लातूर आणि पूणे या तिन्ही शाखांमध्ये एकाच वेळी राबवण्यात येणार असल्याची माहीती संचालक प्रा. बालाजी वाकोडे पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
दोन दशकांपासून एमबीबीएस प्रवेशासाठीचे महाव्दार ठरलेल्या ‘आयआयबी’ च्या माध्यमातून हजारो विद्यार्थी उच्चतम पदव्यात प्राप्त करून वैद्यकीय क्षेत्रात स्थिरस्थावर होऊन रुग्ण सेवेत कार्यरत आहेत नीट-२०२१ परिक्षेत टीम ‘आयआयबी’ आणि विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या खडतर काळातही एमबीबीएसच्या १४७० पेक्षा अधिक जागांवर शिक्का मोर्तब केले आहे तर एम्स सारख्या नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये २५ विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत..
रिपीटर्स साठीची आयआयबी फास्ट निवड चाचणी परिक्षेसाठी आयआयबी एज्यू ॲपच्या माध्यमातून ऑनलाईनव्दारे नोंदणीकृत विद्यार्थी हे ७ ऑगस्ट, रविवार रोजी परिक्षा देतील व त्यातील गुणानुक्रमे पात्र विद्यार्थ्यांची आयआयबी कॅम्पस् येथे गुणानुक्रमे स्कॉलरशिप प्रवेशासाठीची परिक्षा ऑफलाईन पध्दतीने हे ९ ऑगस्ट, मंगळवार रोजी नांदेड-लातूर-पूणे या तिन्ही शाखांवर होईल दोन्ही परिक्षा ह्या नीट च्या अभ्यासक्रमानुसार पिसीबी पॅटर्नप्रमाणे आयोजित करण्यात येतील सविस्तर माहिती साठी आयआयबी च्या www.iibedu.com या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा आयआयबीच्या कार्यालयात ७३०४७३०७३० किंवा ७३०४५६७५६७ संपर्क साधून विद्यार्थ्यांना आयआयबी फास्ट साठी नांव नोंदणी व माहीती घेता येईल.
‘आयआयबी’ ‘फास्ट’ पात्रता व परीक्षा वेळापत्रक –
नांदेड ,लातूर व पूणे या तिन्ही ठिकाणी आयआयबी फास्ट योजना या परीक्षा ठराविक वेळापत्रकानुसार तसेच नीट अभ्यासक्रमाच्या आधारावर पार पडणार आहेत.नीट-२०२३ रिपीटर्स आयआयबी फास्ट नुसार ३००० विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे स्कॉलरशीप
पात्रता –
सर्व नोंदणीकृत विद्यार्थी व अंतिम परीक्षेस पात्र ठरलेले ३००० विद्यार्थी
परीक्षा मोड –
ऑनलाईन (आयआयबी एक्झाम ॲप व्दारे) तसेच ऑफलाईन आयआयबी कॅम्पस
परीक्षा पद्धत –
११वी व १२ वी ,पिसीबी अभ्यासक्रमावर नीट पॅटर्ननुसार ७२० गुणांची परीक्षा
परीक्षा दिनांक –
रविवार,दि.७ ऑगस्ट २०२२ – ऑनलाईन व्दारे नोंदणीकृत विद्यार्थ्यांसाठी
मंगळवार, दि. ९ ऑगस्ट २०२२ – ऑफलाईन आयआयबी कॅम्पस नांदेड-लातूर-पूणे पात्र विद्यार्थ्यांसाठी
पहिली बॅच : मंगळवार, दि. १६ ऑगस्ट २०२२ पासून