उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर माजी विद्यार्थी डीवायएसपी दिलीप टिप्परसे यांच्या उपस्थितीत उदघाटन संपन्न
◆दि.२२ जानेवारी २०२३-आयआयबी महाफास्ट परीक्षेचे आयोजन.., नीट च्या निकालात भारतात विक्रम प्रस्थापित केलेला महाराष्ट्राचा महाब्रँड◆
●नीट २०२२ च्या निकालातून तब्बल ४१ विद्यार्थ्यांना एम्स मध्ये प्रवेश तर १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी MBBS साठी पात्र●
संभाजीनगर(औरंगाबाद)- प्रतिनिधी
महाराष्ट्राचा महाब्रँड असलेल्या आयआयबीने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात दमदार एंट्री करत विद्यार्थी आणि पालकांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण केली. संपूर्ण महाराष्ट्रात नांदेड, लातूर पिंपरी चिंचवड, पुणेशहर , कोल्हापूर शाखांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये दमदार पाऊल टाकले आहे. कल्पतरु बिल्डींग, स्टेशन रोड, गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेजच्या बाजुस संभाजीनगर (औरंगाबाद)शाखेचे उद्धाटन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर व आयआयबी चे माजी विद्यार्थी डीवायएसपी दिलीप टिपरसे यांच्या हस्ते रविवार, दि.१५ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी आयआयबीचे संस्थापकीय संचालक श्री दशरथ पाटील यांच्यासह टिम आयआयबीची उपस्थिती होती..

औरंगाबाद शहर हे मराठवाड्याची’ राजधानी’ असण्याबरोबरच एक ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे मराठवाड्यातील नीट साठी चांगल्या गुणवतेच्या क्लासेसची उणीव आता भरून निघणार असल्याच्या चर्चा या क्षेत्रातील जाणकार करत आहेत.
औंगाबाद हे शहर उद्योग आणि व्यापार क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे अश्या विविधतेने नटलेल्या औरंगाबाद शहरात आयआयबीच्या शाखेमुळे शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच भर पडणार असून महाराष्ट्राचा महाब्रँड असलेल्या आयआयबीची संपूर्ण टिम विद्यार्थ्यांना इ.११ वी, १२ वी, Board, NEET च्या तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहे यासाठी देशातील तज्ञ प्राध्यापक व उत्कृष्ट मॅनेजमेंट टिम या ठिकाणी उपलब्ध असणार आहे अशी माहीती आयआयबीच्या वतीने देण्यात आली.

आयआयबी महाफास्ट परीक्षेचे आयोजन..
इ. १० वीतून ११ वीत जाणाऱ्या व 11 वीतून 12 वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (FREE ADMISSION CUM SCHOLARSHIP TEST)
महाफास्ट परीक्षा आयआयबीच्या सर्व शाखांकरिता असेल
11 वी करीता
परीक्षा दिनांक: रविवार, २२ जानेवारी २०२३,
परीक्षा मोड ऑनलाईन (IIB PCB APP) परीक्षेची वेळ : SMS द्वारे कळवली जाईल.
इयत्ता 12 वी करीता सुध्दा लवकरच महाफास्ट परीक्षेचे आयोजन केले जाईल असेल श्री. दशरथ पाटील यांनी माध्यमांना सांगितले.
आयआयबी महाफास्ट परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी www.iibedu.com या संकेतस्थळावर भेट द्या किंवा 7304730730| 7304567567| 8055730730| 7304567567| 9604730730 या किंवा हेल्पलाईन नंबर संपर्क करण्याचे आवाहन आयआयबीच्या वतीने करण्यात आले आहे …
