30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeशैक्षणिक*आयआयबी चा भारतात उच्चांक तब्बल ४ विद्यार्थ्यांना फिजिक्स मध्ये १८० पैकी १८०...

*आयआयबी चा भारतात उच्चांक तब्बल ४ विद्यार्थ्यांना फिजिक्स मध्ये १८० पैकी १८० गुण*

५५० पेक्षा अधिक गुणप्राप्त तब्बल ३७५ विद्यार्थ्यांचा पालकांसहीत एकत्रित गौरव..

नांदेड – (प्रतिनिधी ) ..

नीट-२०२२ च्या निकालात आयआयबी ने यावर्षी नवा उच्चांक प्रस्थापित करतांना मागील वर्षीच्या ‘नीट’ परीक्षेच्या आपल्याच निकालाची परंपरा खंडीत केली. व पुन्हा एकदा ‘नीट’ परीक्षेत याही वर्षी अव्वल स्थान काबीज केले आहे. या परीक्षेत आयआयबीच्या अनिमेश राऊत ६९२ गुणांसह महाराष्ट्रात पहिला, तर पारस सूर्यवंशी ६९०, श्रुती वीर ६९०, आदित्य केंद्रे ६९० ,गौरव शिंदे ६८५, सौरभ दुघे ६८१, सक्षम करंडे ६८०, हर्षल बोकाडे ६८० असे गुण प्राप्त करत यावर्षीच्या नीट च्या निकालात नवा विक्रम प्रस्थापित केला यासोबतच अवघड समजल्या जाणाऱ्या फिजिक्स विषयात गौरव शिंदे, अन्वेष गंगेवार, शर्वरी कवलकर,शिवम सुर्यवंशी आदी विद्यार्थ्यांनी १८० पैकी १८० गुण प्राप्त केले आहेत या सर्व यशस्वीतांचा एका कार्यक्रमात आयआयबी च्या वतीने पालकांसमवेत गौरव करण्यात आला ..

यावेळी गुणवंताच्या गौरव सभारंभाचे प्रास्ताविक आयआयबी पीसीबी चे अकॅडेमिक संचालक प्रा. वाकोडे पाटील यांनी तर मार्गदर्शन संचालक डॉ. महेश पाटील यांनी केले आणि शेख सादिक यांनी आयआयबी च्या आत्तापर्यंतच्या यशाचा आढावा उपस्थितांच्या समोर मांडला …योसोबतचच नीट मध्ये ५५० अधिक गुण मिळवणाऱ्या तब्बल ३७५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गौरव आयआयबी ने अनोख्या पद्धतीने केला…

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा म्हणून उचित बक्षिसांचे प्रदानही यावेळी करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या आणि

गुणवंताच्या गौरव सोहळ्यासाठी व्यवस्थापकीय संचालक श्री दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टीम आयआयबी च्या सर्व आयआयबी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले…

आयआयबी ने राबवलेल्या पीसीबी पॅटर्न मुळे परराज्यात जाणारा विद्यार्थ्यांचा लोंढा थांबला असून इतर राज्यातून विद्यार्थी नांदेड लातूर आणि पुणे येथे नीट च्या तयारी साठी दाखल होत आहेत. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असून मेस चालक, हॉस्टेल चालक, हॉटेल चालक यासह अनेकांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली असून

आता वर्षानुवर्षे हे आयआयबी च्या निकाला सोबत वाढतच जाईल असा विश्वास या क्षेत्रातील जाणकार बोलुन दाखवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]