दरवर्षी हजारो डॉक्टर व इंजिनियर घडवणाऱ्या आयआयबी करिअर अकॅडमीचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कर्नल डॉ. अशितोष बडोला यांच्या हस्ते नेत्रदीपक उद्घाटन समारंभ संपन्न
“अकोला शहरात” साकारणार नीट व जेईई चा सर्वात यशस्वी “शैक्षणिक पॅटर्न”
अकोला: औद्योगिक नगरी म्हणून अकोला शहराची ओळख आहे. शेजारीच असलेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पावन भूमीचा पावन स्पर्श असलेले अकोला शहर विदर्भातील एक समृध्द शहर म्हणून ओळखले जाते.
पांढऱ्या सोन्याचं म्हणजेच कापसाचे भांडार म्हणूनही या शहराची ओळख आहे, समृद्ध व्यापार पेठ म्हणून विदर्भाचा मुकुटमणी समजलं जाणार अकोला शहर शिक्षण क्षेत्रातही सर्वात पुढे जावं येवढाच हेतू घेवून आयआयबी आपला शाखाविस्तार अकोला शहरात करत आहे.
दरम्यान, नांदेड, लातूर , पुणे ,कोल्हापूर व संभाजीनगर येथे नीट आणि जेईईच्या तयारीसाठी यशस्वी पॅटर्न निर्माण करण्यात व देशभरातील मेडिकल प्रवेशासाठी हजारो विद्यार्थ्यांना घडवून राष्ट्र उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या आणि मागील तब्बल २३ वर्षांपासून देशात सर्वाधिक डॉक्टर घडविणारी संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयआयबी करियर इन्स्टिट्यूटने विदर्भात अकोला येथे आयआयबी (NEET, JEE च्या तयारीसाठी ) शाखेचा शुभारंभ केला आहे. नांदेड ,लातूर, पुणे,कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरा नंतर औद्योगिक “अकोला नगरीत शैक्षणिक पॅटर्न निर्माण” करण्याचा विश्वास आयआयबी व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. आता अकोला येथे शाखा स्थापन झाल्यामुळे विदर्भातील नीट ची तयारी करून डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयबी च्या माध्यमातून मोठा पर्याय निर्माण झाला आहे.
आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट अकोला शाखेचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शुभारंभ सोहळा कर्नल डॉ. अशितोश बडोला तसेच उद्योजक डॉ. गणेश बोरकर यांच्या उपस्थितीत हर्षोल्हासात संपन्न झाला. यावेळी आयआयबी इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील, आयआयबी लातूरचे डायरेक्टर प्रा. चिराग सेनमा, पीसीबी डायरेक्टर प्रा. बालाजी वाकोडे पाटील, आयआयबी पुण्याचे डायरेक्टर ॲड. महेश लोहारे, अकॅडमीक डायरेक्टर डॉ. महेश पाटील, संचालक प्रा. नरेश भोसले प्रसिद्ध उद्योगपती निलकंठ मिरकले, रवी सौदागर, धनंजय जाधव, बालाजी कदम, शेख सादिक, गजानन मोरे, तेजस हळदे, अक्षय नळदकर, व्यावसायिक डॉ. मनोज अग्रवाल यांच्यासह टीम आयआयबी सह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. डॉक्टर होण्यासाठी म्हणजेच वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश पूर्व परीक्षा असलेल्या नीट आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश पूर्व परीक्षा असलेल्या जेईई मेन्स व ॲडव्हांसड परीक्षेच्या तयारीसाठी देशातील नामवंत शैक्षणिक संस्था म्हणून आयआयबी करियर इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे.
सद्यस्थितीत आयआयबी करियर इन्स्टिट्यूटच्या नांदेड, लातूर, पुणे,कोल्हापूर व औरंगाबाद येथे शाखा असून हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या ध्येयप्राप्ती साठी, यशस्वी करीयरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जात आहे. आयआयबीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी अकोला व विदर्भ विभागातील विद्यार्थीसंख्या मोठी आहे ,अतिशय मेहनती व गुणवंत असलेल्या विदर्भातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण अगदी त्यांच्या शहरात देत असल्यामुळे ,प्रवासाचा वेळ व आर्थिक बचत यामुळे मोठा फायदा होणार आहे.सर्व विदर्भातील विद्यार्थ्यांना आता माफक फी मधे दर्जेदार शिक्षण पूर्ण करता येणार आहे. दरम्यान अकोला व विदर्भ विभागातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न विनाअडथळा साकार व्हावे, आपल्या भागाहुन दूर अंतरावर शिक्षणासाठी येताना होत असणारी गैरसोय टाळून विद्यार्थ्यांना सहज दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने आयआयबी करियर इन्स्टिट्यूटने आपला शाखा विस्तार करत अकोला येथे नवीन शाखा स्थापन केली आहे. याशिवाय नीट, जेईईच्या तयारीसाठीचा जो लातूर-नांदेड पॅटर्न आहे त्याच धर्तीवर अकोला पॅटर्न निर्माण करणार असल्याची ग्वाही यावेळी आयआयबी इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, यावेळी अकोलाकरांच्या वतीने आयआयबी करियर इन्स्टिट्यूटने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
//////टीम आय बी चे आवाहन ////////
नांदेड, लातूर , पुणे,कोल्हापूर व औरंगाबाद पॅटर्नच्या धर्तीवर अकोला शहरात ही गुणवत्तापूर्ण पॅटर्न आयआयबी निर्माण करणार आहे. त्यामुळे मेडिकल व इंजिनिअर क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी दहावी नंतर आयआयबीला प्रवेश घ्यावा व विद्यार्थ्यांचे डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आयआयबी करियर इन्स्टिट्यूट सदैव तत्पर रहाणार आहे. आयआयबीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स या विषयांच्या तज्ञ प्राध्यापकांची टीम आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर अकोला शहराचीही शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती करून दाखवणार हे मात्र नक्की. तरी AIIMS व JEE या परीक्षेची तयारी करून डॉक्टर व इंजिनियर बनण्याचे ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयआयबी कॅम्पसला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्यावी असे आवाहन टीम आयआयबी च्या वतीने करण्यात आले आहे.
_