पक्षाची विजयी पताका घेवून उमेदवाराच्या पाठीशी रहा
ः आ. संभाजी पाटील निलंगेकर
लातूर/प्रतिनिधी ः लातूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांचा विजय निश्चित आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी पताका घेवून उमेदवाराच्या पाठीशी रहावे, असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

आ. निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहर मतदारसंघातील सिध्देश्वर मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळ, महात्मा बसवेश्वर मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मंडळ, दयानंद सरस्वती मंडळ, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर मंडळतील बुथ प्रमुखांच्या बैठका संपन्न झाल्या. या बैठकांना मार्गदर्शन करताना आ. निलंगेकर बोलत होते.

या बैठकांना डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर, लोकसभा प्रभारी किरण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, शहर विधानसभा प्रमुख गुरुनाथ मगे, प्रदेश उपाध्यक्ष अजीत पाटील कव्हेकर, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव, महिला आघाडी शहराध्यक्षा रागिनी यादव, लोकसभा विस्तारक सिध्देश्वर पवार, सुधीर धुत्तेकर, अॅड. शैलेश गोजमगुंडे, अॅड. दिपक मठपती, अॅड. दिग्वीजय काथवटे, मंडल अध्यक्षा शोभाताई पाटील, मिनाताई गायकवाड, माजी नगरसेवक अनंत गायकवाड, सुनिल मलवाड, संगीत रंदाळे, मिनाताई भोसले, सुनील होनराव, प्रदीप मोरे, सुरेश राठोड, दिलीप धोत्रे, श्रीधर सोनटक्के, अरविंद शिंदे, विकास पाचपिडे, महेश महाले, पांडुरंग पवार, सुधाकर दोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. निलंगेकर म्हणाले की, आता भाषणाचा काळ संपला आहे. प्रत्येक बुथवर बैठका घेतल्या जात आहेत. मी स्वतः जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर जात आहे. लातूर मतदारसंघात आजही भाजपाचेच वर्चस्व आहे. ते आपल्याला मतदानातून दाखवून द्यायचे आहे. आपले उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांना लातूर शहर मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल याची मला खात्री आहे. बुथप्रमुख हेच पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या पाठबळावरच आपले उमेदवार गतवेळपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील असेही आ. निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.

खा. सुधाकर श्रृंगारे यांचा उमेदवारी अर्ज भरताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.