भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
लातूर दि. ३० – भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिवसानिमित्त सोमवार ३० मे २०२२ रोजी लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक गावागावत ग्रामदेवतांना महाअभिषेक, रक्तदान शिबीर, पेढेतुला, कुस्तीस्पर्धा, यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आध्यात्मीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह, राजकारणात सतत अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे, शेतकरी शेतमजूरासह गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सतत संघर्ष, गरजुंना वेळोवेळी मदत, कार्यकर्त्यांना बळ देवून मान आणि सन्मान, हजारो कुटूंबांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून दिलासा देणारे सर्वांना आपलेसे वाटणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिवसानिमित्त सोमवार ३० मे २०२२ रोजी लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने अभिष्ठचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणापूर येथील ग्रामदेवता आदिशक्ती श्री.रेणूकादेवी मंदिरात ३० मे २०२२ रोजी सकाळी ९ वाजता भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड साहेब यांच्या शुभहस्ते अभिषेक आणि आरती करण्यात येणार असून त्यानंतर मंदिरात भाजपाचे लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे यांच्या वतीने आ. कराड साहेबांचा पेढेतुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रेणापूर येथील विविध कार्यालयात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त संयोजन समितीच्या वतीने सकाळी ११ वा. अभिष्ठचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळयाला भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मित्रपरिवारांनी ‘संवाद’ या आ. रमेशअप्पा कराड यांच्या लातूर येथील अंबाजोगाई रोड वरील असलेल्या नवीन संपर्क कार्यालयात आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने अनिल भिसे, बन्सी भिसे, अॅड.दशरथ सरवदे, हणमंतबापू नागटिळक, पद्माकर चिंचोलकर आणि राजकिरण साठे यांनी केले आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड साहेब यांच्या जन्मदिनानिमीत्त यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालय येथे सकाळी ९ वा. श्रीमती सरस्वती कराड रक्त पेढीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तर दुपारी ३ वाजता लातूर तालुक्यातील मौजे नांदगाव येथे पवनपुत्र हनुमान मैदानी कुस्तीस्पर्धेचे आयोजन ऋषीकेश कराड मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आ. रमेशअप्पा कराड यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घ आयुष्य लाभावे यासाठी रेणापूर तालुक्यातील मौजे दर्जीबोरगाव येथील चिन्मयानंद स्वामी देवस्थान येथे अभिषेक, मौजे मोटेगाव येथील तात्यामहाराज मंदिरात महाआरती, मौजे शेरा येथील दावद मलिक बाबा दर्गाह येथे चादर चढवणे, मौजे दवणगाव येथील श्री दवणेश्वर मंदिरात अभिषक, पानगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे पुजन, मौजे कोष्टगाव येथील श्री. निळकंठेश्वर मंदिरात अभिषेक, खरोळा येथील श्री दत्त मंदिर आणि गोविंदनगर येथील श्री बालाजी मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर तालुक्यातील मौजे सोनवती येथील खंडोबा मंदिरात अभिषेक, मुरूड अकोला येथे दर्गाहला चादर चढवणे, मुरूड येथील मुरूडेश्वर मंदिरात महापूजा, मौजे सारसा येथील गणेशनाथ देवस्थानात महाआरती, मौजे चिंचोली ब. येथील बल्लाळनाथ मंदिरात महापूजा, मौजे निळकंठ येथील श्री निळकंठेश्वर मंदिरात महापूजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच औसा तालुक्यातील मौजे भादा येथे हरीहर मंदिर येथे अभिषेक, मौजे टाका येथील भिमाशंकर मंदिरात अभिषेक व साखर वाटप, मौजे शिवली येथील हनुमान मंदिरात महापूजा व केळीचे वाटप, मौजे काळमाथा येथील महादेव मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लातूर ग्रामीण मतदार संघातील गावा गावातील भाजपाचे कार्यकर्ते ग्रामदेवतांची विधीवत महापुजा करून आ. रमेशअप्पा कराड साहेब यांना दिर्घ आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करणार आहेत.