माजी पालकमंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रकल्पाची पाहणी करून पाळूवर भेगा पडल्याने अधिकार्यांना कामाच्या सुचना केल्या
निलंगा-(माध्यम वृत्तसेवा )-तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेगा पडल्याची घटना समोर आल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवार ( दि.10 ) सकाळी माजी पालकमंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अधिकार्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाची पाहणी करून दुरूस्ती संदर्भात अधिकार्यांना सुचना केल्या.
सर्वात जुना आणि मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्या मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेगा पडल्याची घटना समोर आल्याने सर्वञ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सुरक्षेच्या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या वतीने सहा गेट उचलून जवळपास 50 टक्के पाणयाचा विसर्ग करण्यात आला.मंगळवारी सकाळी माजी पालकमंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी वरिष्ठ अधिकिर्यांसमवेत मसलगा मध्यम प्रकल्पाची पाहणी केली.यावेळी लाभक्षेञ विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता विजय घोगरे,अधिक्षक अभियंता इ.म.चिस्ती,कार्यकारी अभियंता पाटील,विजयकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
आ.निलंगेकर यांनी ज्या ठिकाणी भेगा पडल्यात त्या ठिकाणची पाहणी करून प्रकल्पाच्या सुरक्षे संदर्भात अधिर्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.तसेच ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्या ठिकाणची पाळू नवीन करण्याच्या सूचनाही दिल्या.ज्याठिकाणी भेगा पडल्या आहेत तिथे एक मिटरपर्यंत खोल खड्डा खोदून भेगा खोलवर आहेत का हे पाहण्यात आले.त्यावेळी भेगा खोल नसल्याचे निदर्शनास आले,माञ वरिष्ठ अधिकार्यांनी आ.निलंगेकर यांच्या सुचनेनुसार खचलेली सर्व पाळू नवीन करावी लागणार असल्याचे सांगून 100 मिटर नवीन पाळूचे उन्हाळ्यात हे काम सुरू होईल,असे सांगितले.
दरम्यान सध्या मसलगा प्रकल्पाच्या पाळूची रूंदी चार मीटर आहे.त्या मधोमध मोठ्या भेगा पडल्या आहेत.आता नवीन पाळू करताना जुनी पाळू काढून नवीन पाळूची रूंदी सात मीटर होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.