18.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*आमदार निलंगेकर यांच्या हाकेला जनतेचा प्रतिसाद*

*आमदार निलंगेकर यांच्या हाकेला जनतेचा प्रतिसाद*

आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेस उर्स्त्फुत प्रतिसाद
दहा दिवसांदरम्यान मतदारसंघातील जनतेचा मोठा सहभाग

निलंगा(माध्यम वृत्तसेवा)- : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दि. २४ आॅगस्ट पासून माकणी थोर येथून जनसन्मान पदयात्रा काढलेली आहे. या पदयात्रेस उर्स्त्फुत प्रतिसाद मिळत असून या दहा दिवसांदरम्यान मतदारसंघातील जनतेने यात्रेत मोठा सहभाग नोंदविलाआहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आ. निलंगेकर केवळ मतदारांच्या उर्स्त्फुत प्रतिसादाने मिळालेल्या ऊर्जेद्वारे चालताना पाहण्यास मिळत आहेत.

या यात्रेत मतदारांशी संवाद साधताना आ. निलंगेकर गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या विकासाचा लेखा जोखा मांडत भावी पीढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आशिर्वाद द्यावा अशी साद घालत आहेत. त्यांच्या या हाकेला मतदारही तितकाच प्रतिसाद देत असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या निलंगा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दि. २४ आॅगस्टपासून निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथून जनसन्मान पदयात्रा सुरू केलेली आहे. विकासाची वारी आपल्या दारी असे ब्रिद घेवून निघालेल्या पदयात्रेच्या माध्यमातून आ. निलंगेकर मतदारसंघातील १०० गावांना भेटी देवून ३०० कि़मी. पायी प्रवास करत आहेत. या यात्रेत पहिल्या दिवसापासूनच मतदारसंघातील जनता मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ या तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भाग या पदयात्रेद्वारे आ. निलंगेकरांनी ढवळून काढलेला आहे.

गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा ते जनतेसमोर मांडत असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटपही या यात्रेदरम्यान करण्यात येत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही आ. निलंगेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. या यात्रेदरम्यान होणाºया संवाद सभांना गावा-गावातील महिलांचीही लक्षणीय उपस्थिती लाभत आहे.
आ. निलंगेकर या यात्रेदरम्यान जनतेशी संवाद साधत असताना केंद्र व राज्यातील सरकार लोकहिताचे असून प्रत्येक उंबरठ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात येत आहे. लोकसभेत विरोधकांनी दिशाभूल करीत अपप्रचार केला होता. आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीतही विरोधकांचा तोच प्रयत्न राहणार असल्याचे आ. निलंगेकर सांगत आहेत. त्यामुळेच विरोधकांच्या भूलथापा व अपप्रचाराला बळी न पडता समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी बांधिल असलेल्या उमेदवाराला व पक्षाला खंबीर साथ देवून आशिर्वाद द्यावा, असे आवाहन ते करीत आहेत. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांकडून हात उंचावून तितकाच मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

गौर आनंदवाडी साजरा केला पोळा
पदयात्रेच्या दहाव्या दिवशी आ. निलंगेकर निलंगा तालुक्यातील गौर आनंदवाडी येथे पोहोचले या दिवशी बैलपोळा असल्याने याच गावात त्यांनी पोळ्याचा सण साजरा केला. या गावातील शेतकºयांनी काढलेल्या बैलांच्या मिरवणूकीत सहभाग नोंदवून आ. निलंगेकरांनी बैलांचे पुजन करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी त्यांच्या समवेत भालकीचे माजी आ. प्रकाश खंड्रे यांच्यासह मतदारसंघातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज दि. ३ सप्टेबर रोजी गौर आनंदवाडी या गावाची ग्रामसभा आ. निलंगेकर यांच्या उपस्थितीत पार पडणार असून यानंतर प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मतदारसंघातील विविध समस्यांचे निराकरण आ. निलंगेकर यांच्याकडून करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]