कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी जन सन्मान पदयात्रा
जनसन्मान पदयात्रेचा आ. सांभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून श्रीगणेशा
लातूर/प्रतिनिधी : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पदयात्रेची सुरुवात शनिवारी (दि.२४ ) माकणी गावातून करण्यात आली.माकणीच्या जागृत हनुमान मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेस प्रारंभ झाला.गेल्या पाच वर्षांत केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी ही पदयात्रा असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले.ज्या पद्धतीने वारकरी पांडुरंगाची वारी करतात त्याचप्रकारे जनतेच्या रूपात ज्या पांडुरंगाला मी पाहतो,त्या मायबाप जनतेचा सन्मान करण्यासाठी येणारे १२ दिवस ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला भगिनींचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली.यातून माता-भगिनींना प्रतिमाह १,५०० रुपये देण्यात येत असून यामुळे महिलांचे आर्थिक सबलीकरण होणार आहे. त्याचबरोबर मुलींचे पदवीपर्यंतचे शिक्षण देखील सरकारने मोफत केले आहे.शेतकरी बांधवांच्या समृद्धीसाठी विशेष प्रयत्न केले. कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला.कोयाची वाडी आणि चन्नाचीवाडी या दोन्ही वाड्या गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित होत्या.गेल्या काळात येथे सातत्याने विकास झाला असून आणखी बरीच विकासकामे प्रगतीपथावर आहेत.आगामी काळातही विकासाची ही गंगा अशीच वाहत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी शासकीय योजनेचे लाभार्थी ठरलेले गावकरी तसेच महिला भगिनींना प्रशस्तीपत्र देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला.
या जनसन्मान पदयात्रेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. टीका करण्याचे काम अगदी सोपे असल्यामुळे मी ते काम विरोधकांना दिले असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले. कोविडच्या काळात ज्यावेळी सर्व नेतेमंडळी घरात बसून होती त्यावेळी,हा संभाजीराव तुमच्या सेवेत होता,असेही त्यांनी सांगितले.दरम्यान आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मातोश्री माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यादेखील जनसमान पदयात्रेस आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत्या.आपण जीवन जगताना तसेच राजकीय आणि सामाजिक काम करताना कुठलाही बडेजाव करायचा नाही. जेणेकरून समोरून आलेल्या माणसाला आपण त्यांचा माणूस वाटलो पाहिजे,असे बाळकडू मी त्यांना दिल्याचे म्हणाल्या.
या प्रसंगी बसवकल्याचे आ. शरनू सलगर, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर माजी जि. प. अध्यक्ष राहूल केंद्रे, माजी सभापती संजय दोरवे, जिल्हा सरचिटणीस भारत चामे यांनी मनोगत व्यक्त करत आ. निलंगेकरांच्या विकासकामंचे व त्यांच्या करायचे कौतुक करत हे नेतृत्व मतदार संघातील जनतेने तळ हाताच्या फोडप्रमाणे जपावे असे आवाहन केले.
आ.निलंगेकर यांचे शेकडो महिलांनी राखी बांधून औक्षण केले.
यावेळी आ.निलंगेकर यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.माकणीचे सरपंच तुकाराम सुर्यवंशी, चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माकणी (थोर) येथे विविध विकास कामाचा आ.निलंगेकर यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.तेथून कोयाचीवाडी आणि चन्नाचीवाडी येथील नागरिकांनी गावात आगमन होताच पदयाञेवर जेसीबीने पुष्पवृष्टी केली.गावात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
माकणी,कोयाचीवाडी चन्नाचीवाडी,सावरी,माने जवळगा शेळगी येथील लाडकी बहिण योजनेसाठी पाञ महिलांना आ.निलंगेकर यांच्या हस्ते प्रमाणपञ देऊन सन्मानित करण्यात आले.
निलंगा तालुक्यातील शेळगी येथे या जन सन्मान पदयाञेचा मुक्काम असून येथील गावक-यांशी आ.निलंगेकर संवाद साधणार आहेत.गाव,वाडी-वस्ती येथील नागरिक ‘विकासाची वारी-
जनतेच्या दारी’ या पदयाञेत सहभागी होऊन समर्थन देत आहेत.
निलंगा मतदारसंघात निघालेल्या जनसन्मान पदयाञेस मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठींबा देत आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निघालेल्या पदयाञेत सहभागी होऊन पाठींब्याचे पञ दिले.
यावेळी बसवकल्याणचे आ.शरणूजी सलगर, माजी खा. सुनील गायकवाड,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, प्रदेश प्रवक्ता प्रेरणा होणराव, अरविंद पाटील निलंगेकर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवान पाटील तळेगावकर,माजी जि.प. अध्यक्ष मिलिंद लातूरे, निलंगा विधानसभा प्रभारी दगडु सांळुके,दगडु सांळुके,गणेश आकडे, भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे,संघटन सरचिटणीस तथा माजी जि.प. सभापती संजय दोरवे,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,शीतल मालू,शोभाताई पाटील,
श्रीकांत पाटील, संदीप सगरे,नागुजी येरोळे, शिवाजी टेकले,रामलिंग टेकले,उध्दव सगरे, मधुकर सगरे,ज्ञानोबा सगरे, महात्मा सगरे,विद्यानंद सगरे,प्रल्हाद पाटील आदींसह पंचक्रोशीतील नागरिक व पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा…
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काढलेल्या जनसन्मान पदयात्रेस मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा दिला आहे. मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र आ.
निलंगेकर यांना सुपूर्द केले.कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभागही नोंदवला.
जनतेच्या सन्मानासाठी पहिलीच पदयात्रा …
आजवर अनेक यात्रा व पदयात्रा काढण्यात आल्या परंतु जनतेच्या सन्मानासाठी काढण्यात आलेली ही पहिलीच पदयात्रा ठरली.आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील ३०० किलोमीटरचा प्रवास या पदयात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे.यात शासनाच्या योजनांची माहिती देत विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजनही केले जात आहे.त्यामुळे या पदयात्रेचे गावागावातील नागरिकांकडून उत्साहात स्वागत केले जात आहे.