लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांसाठी ‘ खेलो इंडिया ‘ अंतर्गत १० इनडोअर व आऊटडोअर स्टेडियम व क्रीडा केंद्र उभारणीसाची…
केंद्रीय मंञी अनुराग ठाकूर यांच्याकडे आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मागणी…
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांसाठी ‘खेलो इंडिया’ अंतर्गत १० इनडोअर व आऊटडोअर स्टेडियम तसेच क्रीडा केंद्र उभारण्याची मागणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना केली आहे. लातूर जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडू, त्यांच्या क्षमता आणि त्यांचे योगदान याविषयी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी या मागणी विषयी सकारात्मकता दर्शविली असल्याचे माजी पालकमंञी तथा आ.निलंगेकर यांनी म्हटले आहे.
लातूर जिल्ह्यातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि साहित्य मिळत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. क्षमता असूनही अनेक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेस मुकावे लागत असल्याच्या अनुषंगाने ही मागणी करण्यात आली असल्याचे माजी पालकमंञी तथा आ.निलंगेकर यांनी सांगितले आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’ या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी खेळांचे केंद्र तयार करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यातही बॉक्सिंग, कुस्ती आणि बॅडमिंटन या तिन्ही खेळांची केंद्रे उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र या बाबतीत अजुन सुद्धा प्रगती होणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंञी अनुराग ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे माजी पालकमंञी तथा आ. निलंगेकर यांनी म्हटले आहे.