*आमदार निलंगेकर यांचा इशारा*

0
204

मराडवाड्यातील शेतकर्‍यांच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाला स्वस्त बसू देणार नाही-आ.संभाजीराव पाटील निलंगेकर

निलंगा,-(प्रशांत साळुंके)-अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याचे खरीप हंगामातील सर्व पिके उध्वस्त झाले असून अशा संकटाच्यावेळी राज्य शासनाकडून धीर देण्याची गरज होती माञ हे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असून जोपर्यत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही तोपर्यत स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा माजी मंञी संभाजीराव पाटील यानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला आहे.

याप्रसंगी, राज्याचे भाजपा सचिव अरविंद पाटील निलंगेकर,तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे,जिल्हा महामंञी संजय दोरवे,जि.प.उपाध्यक्षा,भारतबाई सोळुंके,चेअरमन दगडू सोळुंके,विरभद्र स्वामी,मिलिंद लातूरे,व्यंकट धुमाळ,काशीनाथ गरीबे,मंगेश पाटील,सभापती राधा बिराजदार अदी उपस्थित होते.

पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की राजकारणात काम करत असताना किती मोठ्या पदावर गेलोतरी जणतेचा कार्यकर्ता म्हणून काम करावे ही भावना पदाधिका-यांने ठेवावे राजकारणात सत्ता येते जाते माञ सत्तेच्या काळात व सत्ता नसलेल्या काळात कोण सोबत रहातो ही खरी परिक्षा असते,असे सांगून पदाधिका-यांनी जमीनीवर रहावे असा सल्ला दिला.

अतिवृष्टीने मांजरा व तेरणा काठावरील शेतकऱ्यांचे पुराने मोठे नुकसान झाले आहे.या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांची चेष्टा केली आहे.आमच्या काळात एका गावचा पंचनामा करून भरपूर मदत संपूर्ण जिल्ह्याला मिळवून दिली होती.परंतु हे सरकार व सरकार मधील पालकमंञी देशमुख हे पंचनामे करण्यातच मग्न दिसत असल्याचा आरोप केला.म्हणून या सरकारने सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली सोमवार मंगळवार व बुधवार असे तीन दिवस लातूर येथील शिवाजी चौकात जिल्ह्यातील ७२ शेतकरी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

एवढे करूनही सरकारला जाग येत नसेल तर १६ आक्टोबर रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेला या सरकारला सदबुद्धी यावी यासाठी पदयार्ता काढून जाणार आहे.तसेच यावरही हे सरकार ठाम असेल तर विधानभवणावर मराठवाड्यातील हजारो शेतकरी घेऊन व सोयाबीन पेंडी नेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याना देणार असल्याचाही इशारा दिला आहे.

या आंदोलनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान निलंगेकर यानी केले.

सिंहासन हे आमचे ध्येह नसून संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कठोर पावाले उचत जेलभरो आंदोलन करू व सरकारला नुकसानभरपाई देण्यास भाग पाडू असा सज्जड दम त्यानी दिला.तसेच जुलै महिण्यात झालेल्या अतिवृष्टीचा एक रूपयाही लातूर जिल्ह्याला मिळाला नाही याची खंत त्यानी व्यक्त करत पालकमंञी निष्क्रिय असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही कारण शेतकऱ्यांच्या व्यथाची जाणीव नसलेला हा पालकमंञी आहे अशी टीका अमित देशमुख यांच्यावर निलंगेकर यानी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here