17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*आमदार निलंगेकरांच्या पदयात्रेत पंकजा मुंडे सहभागी*

*आमदार निलंगेकरांच्या पदयात्रेत पंकजा मुंडे सहभागी*

जनसन्मान पदयात्रेचा उपक्रम राज्याला दिशा देणारा
-आ.पंकजाताई मुंडे

निलंगा/(वृत्तसेवा):कोट्यवधी रुपयांची विकास कामे होत असतात परंतु कामे झाल्यानंतर जनतेला भेटून त्यांच्यासमोर नतमस्तक होणारा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुरू केलेला जनसन्मान पदयात्रेचा उपक्रम राज्याला दिशा देणारा आहे,असे प्रतिपादन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, माजीमंत्री आ. पंकजाताई मुंडे यांनी केले.

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघात काढलेल्या जनसन्मान पद यात्रेदरम्यान मंगळवारी (दि.२७) सकाळी वलांडी येथे आ.मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न झाली.माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सभेस जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवानदादा पाटील तळेगावकर,माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, मिलिंद लातुरे,किरण उटगे, बापूराव राठोड,माजी जिप उपाध्यक्षा भारतबाई साळुंके,जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, माजी सभापती गोविंद चिलकुरे,विधानसभा प्रभारी दगडू साळुंके, प्रशांत पाटील, चंद्रशेखर महाजन,सदाशिव पाटील, कुमार पाटील,यशवंत पाटील,राम रेड्डी,पप्पू पाटील,यशवंत कांबळे, बालाजी धनगावे, सुखानंद काळशेट्टे,सुरेश शिंदे, सुग्रीव किसवे,लातूर शहराध्यक्ष देविदास काळे, सुधीर धूत्तेकर,प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव,तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे,मंगेश पाटील,कुमोद लोभे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी मार्गदर्शन करताना पंकजाताई म्हणाल्या की,विकास करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे.आ. संभाजीराव पाटील यांनी कोट्यवधींची कामे केलेली आहेत.ती केल्यानंतरही जनतेसमोर जाऊन नतमस्तक होण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. जनतेच्या सन्मानासाठी, नागरिकांना भेटण्यासाठी आ.संभाजीराव पाटील यांनी ३०० किलोमीटरची पदयात्रा काढली आहे.ते जनतेत जात आहेत. भेटीगाठी घेत आहेत. समाजात मिसळून नागरिकांची मते,प्रतिक्रिया जाणून घेत आहेत.त्यामुळे तीनशे किलोमीटरच्या या पदयात्रेनंतर निलंगा विधानसभेतील नागरिक तीन हजार पट अधिक मतांनी त्यांच्या पाठीशी उभे राहतील,असेही त्या म्हणाल्या.आज ज्या पद्धतीने आपणावर पुष्पवृष्टी होत आहे त्याच पद्धतीने मतांची वृष्टीही होईल,असे त्या म्हणाल्या.


आ.संभाजीराव पाटील निलंगेकर नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होतात.जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अग्रभागी असतात.संकटात धावून येतात.आपल्या सुख-
दुःखात धावून येणाऱ्या या नेत्याच्या पाठीशी उभे रहा,असे आवाहनही त्यांनी केले.


आ.संभाजीराव पाटील हे स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्याची क्षमता व धमक त्यांच्यात आहे,असेही पंकजाताई म्हणाल्या.
यावेळी बोलताना आ.संभाजीराव पाटील म्हणाले की,माझी व मुंडे साहेबांची पहिली भेट वलांडी येथेच झाली होती. स्व.मुंडे साहेबांनीच देवणी तालुक्याची निर्मिती केली आहे.त्यांच्या स्वप्नातील तालुका विकसित करण्याचे काम एक कार्यकर्ता म्हणून मी करत आहे.मुंडे यांचे तालुक्यावर अन तालुक्याचे मुंडे यांच्यावर कायमच प्रेम राहिलेले आहे.हे प्रेम यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम पाटील, सूत्रसंचलन प्रशांत पाटील दवणहिप्परगेकर तर आभार प्रदर्शन रामलिंग शेरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]