लातूर :
लातूर तालुक्यातील ममदापूर, सलगरा बु., गोंदेगाव, औसा तालुक्यातील मातोळा, रेणापूर तालुक्यातील चाडगाव तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा, दैठणा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित व बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
औसा तालुक्यातील मातोळा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत जयमल्हार शेतकरी सहकार विकास पॅनलचे सर्वच १३ उमेदवार विजयी झाले. याबद्दल आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते पॅनल प्रमुख व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संतशिरोमणी मारोती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब भोसले, सचिन दाताळ, संजय भोसले, बाबासाहेब दारफळकर, माणिक मोरे, प्रशांत भोसले, बालाजी सूर्यवंशी, विजय भोसले, धनंजय भोसले, गणेश भोसले, धनसिंह भोसले, व्यंकट भोसले, मुकुंद भोसले, राजेंद्र भोसले, विक्रम भोसले, व्यंकट मोरे, सयाजी दारफळकर, वर्षा आनंदगावकर, वत्सलाबाई भोसले, सिंधुबाई गायकवाड, गजानन माळी, दत्तू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

रेणापूर तालुक्यातील चाडगाव येथील सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या बळिराजा विकास पॅनलचे उमेदवार व पॅनल प्रमुखांचा आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड प्रमोद जाधव, लक्ष्मण मोरे, संभाजी सूळ, यशवंतराव पाटील, राजकुमार जाधव, शिवराज माने, बालासाहेब शिंदे, केशव माने, संतोष माने, राजाभाऊ माने, ज्ञानेश्वर कुरडे, हनुमंत माने, निर्मला शिंदे, अभिमान माने, ऋतुजा माने, बापूसाहेब जाधव, ज्योतीराम समदडे, भागवत सोमवंशी, महेश माने आदी नूतन संचालकांसह किशोर माने, इंद्रजित शिंदे, विश्वनाथ शिंदे, भाऊसाहेब माने, बाबुराव येळकर, ओम सूर्यवंशी उपस्थित होते.

लातूर तालुक्यातील सलगरा बु. येथील सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख साहेब शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख जितेंद्र स्वामी, हरिभाऊ गायकवाड, नूतन संचालक दत्तात्रय ढेकणे, विश्वनाथ बोळगावे, आनंद सपाटे, दिनकर ढेकणे, शिवाजी बाजुळगे, सोपान सुडे, ज्ञानोबा बदने, बालाजी खराडे, लिंबराज पाटील, पंकज बावलगे, सुधाकर बेंद्रे उपस्थित होते. ममदापूर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत सोसायटी बचाव परिवर्तन सहकार पॅनलचे एक बिनविरोध व १२ उमेदवार निवडून आले. याबद्दल त्यांचा आमदार धिरज देशमुख यांनी सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमोद जाधव, पॅनल प्रमुख ज्ञानोबा शेळके, सतीश पाटील, संभाजी रेड्डी, सरपंच चंद्रकांत पासमे, ज्ञानोबा गवळे, हेमंत पासमे, राजू वंगवाड, अंकुश शेळके, बंडू पाटील, मेघराज पाटील, बिनविरोध नूतन संचालक रमेश सुरवसे, नवनिर्वाचित संचालक जनार्दन थोरमोटे, दिलीप शिंगडे, राजू शेळके, चंद्रकांत डोपे, वसंत पाटील, दिपक पाटील, अंगद वंगवाड, भागवत बनसोडे, पंडित दुडिले, धनंजय पासमे, रमाकांत वंगवाड आदी उपस्थित होते. गोंदेगाव येथील सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथील सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी बँकेचे संचालक व पॅनल प्रमुख व्यंकटराव पाटील, विठ्ठलराव पाटील, बजरंग मोरे, योगेश बिरादार, गोविंद मोरे, पंडित माने, नूतन संचालक उमेश मोरे, बालासाहेब माने, कल्याण बिरादार, गणेश पाटील, सिंधुबाई पाटील, विजयकुमार कावळे, भरत महाके, शहाजी कांबळे, संजीव हुले, राजाबाई पाटील, महादेव बिरादार, शिवाजी बिरादार, आबा पाटील उपस्थित होते. राणी अंकुलगा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्रीकृष्ण विकास शेतकरी पॅनलचे १२ उमेदवार निवडून आल्याबद्दल त्यांचा आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद जाधव, पॅनल प्रमुख व नूतन संचालक जयद्रथ शेंडगे, शिवसंतोष देशमुख, नागनाथ पाटील, भाऊसाहेब पाटील, व्यंकट मल्लिशे, विश्वनाथ स्वामी, गोविंद पिटले, नामदेव गुणाले, विजयकुमार शेंडगे, लिंबराज शेंडगे, राजकुमार शेंडगे, गोविंद पाटील आदी उपस्थित होते.
—-