16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*आमदार अभिमन्यू पवार यांचे संजय राऊतांना चोख प्रत्युत्तर….!*

*आमदार अभिमन्यू पवार यांचे संजय राऊतांना चोख प्रत्युत्तर….!*

सोशल मीडियातून मतदारसंघातील विकास कामांचा दाखला देत राऊतांवर टिका..

औसा (. वृत्तसेवा )- औसासाठी आणि लातूरला आमदार अभिमन्यू पवार यांनी काय केलं याचा हिशोब द्यावा अशी विचारणा औसा येथील सभेत खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर राऊत यांना आमदार पवार यांनी चोख प्रत्युत्तर देत मतदारसंघातील विकास कामांचा दाखला दिला आहे. मतदारसंघात अडीच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देत गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला किल्लारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू केल्याचे सांगून महाराष्ट्राच्या राजकारणातील किळसपात्र, रोज सकाळी माध्यमांसमोर गरळ ओकणारा भोंगा भर दुपारी औशात वाजला म्हणून जोरदार टीका केली आहे.

सोलश मीडियावर आ. अभिमन्यू पवार यांनी संजय राऊत यांना राजीव गांधी चौकापासून लामजना पाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत १० मी रुंदीचा ३५० कोटी रुपयांचा रस्ता मंजूर करून आणला आहे, औसा शहरातील भव्य नूतन बसस्थानक, औसा येथे कार्यान्वित झालेले वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय, शहरात बांधकाम सुरु असलेले १४ सार्वजनिक शौचालय, २५ खाटांचे औसा ग्रामीण रुग्णालय ज्याला काही दिवसांपूर्वीच १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात दर्जोन्नत करण्यास मी मंजुरी मिळवली आहे. लामजना पाटीवर एका ग्रामपंचायतच्या गावात बांधलेले १.५ कोटींचे बसस्थानक, “राजमाता जिजाऊ – शाळा माझी न्यारी” या अभियानाअंतर्गत मी जिल्हा परिषद शाळेत सीएसआरमधून उभारत असलेल्या जागतिक दर्जाच्या शिक्षण सुविधा, मातोळा – आशिव – किल्लारी – सिंगनाळ या रस्त्यासाठी ४५० कोटी रु. मंजूर, दोनच दिवसांपूर्वी किल्लारीतील ४५३ कुटुंबांचा २२ वर्षांपासून रखडलेला ८ व्या व ९ व्या फेरीतील कबाले वाटपाचा विषय मार्गी लावण्यात आला.”९५ कोटींचे कर्ज आणि १५ वर्ष बंद असलेला हा कारखाना सहकारी तत्वावर पुनर्जीवित केला आहे”किल्लारीत लवकरच अपर तहसीलदारांचे कार्यालय लवकरच मंजूर होणार आहे. आणि किल्लारीत लवकरच महाराष्ट्रातील दुसरे स्वतंत्र आयुष रुग्णालय उभारले जाणार आहे. रामलिंग मुदगड, कासार सिरसी वाडी इत्यादी गावांजवळ रस्त्यांची कामे सुरु आहेत.१५ कोटींच्या शिरढोण मोड ते कासार सिरसी ग्रामीण रुग्णालय या मुख्य रस्त्याचे एका साईडचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या साईडचे काम प्रगतीपथावर आहे. कोराळी – कोराळी वाडीला जाणारा रस्ता महाविकास सरकारने रद्द केला होता. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तो रस्ता मंजूर करून आणला, त्याचेही काम प्रगतीपथावर.कासारसिरसी बसस्थानक, कासार सिरसीत स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय आणि महावितरणचे उपविभागीय कार्यालय कार्यान्वित झालेले आहे. त्याच कासार सिरसीत कोट्यवधी रुपयांच्या शासकीय इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.गोगलगायी प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी निकषाबाहेर जाऊन ४२० कोटींची नुकसानभरपाई मंजूर करून आणली. बेलकुंड येथे एमआयडीसी मंजूर करून आणली.

शेवटी आ. पवारांनी संजयजी, आपण विचारलात म्हणून सांगतो २५०० कोटींपेक्षा अधिकचा निधी मतदारसंघात आणला आहे. बुधोडा ते कासार सिरसी प्रवासादरम्यान मतदारसंघातल्या कुठल्याही गावात ५ मिनिटे थांबून विचारपूस केली असतात तर कळले असते की मतदारसंघात असे एकही गाव नाही जिथे आपण कोटीच्या खाली निधी दिला असेल. कुण्याही गावात गेला असतात तर २-४ शेतरस्ते, गोठे तुम्हाला नक्की पाहायला मिळाला असता असा टोमणा मारून खासदार संजय राऊत यांचा भरघोस समाचार घेतला आहे…..

………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]