आमदार अभिमन्यू पवार यांचा इशारा

0
206

यापुढे कामाच्या बाबत कानाडोळा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – आ. अभिमन्यू पवार. 

आ. अभिमन्यू पवार यांनी घेेतली पालकमंत्री पाणंद रस्ते, तांडे – वाडी विकास व कृषी आढावा बैठक.

निलंगा,-( प्रशांत साळुंके )- यापुढे कामाच्या बाबत कानाडोळा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तुम्ही जनतेचे करा मी आनंदी राहिण चुकीच्या गोष्टींची पाठराखण मी करणार नाही शंभर टक्के जनतेचे काम करा शेतकरी आत्महत्याचा कलंक आपणाला पुसून काढायचा आहे. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे काम प्रशासनाला करायचे आहे. यासाठी प्रशासनाने काम करण्यावरच अधिक भर द्यावे शेतकऱ्यांचे कामे सामाजिक समाधानासाठी करणे आवश्यक आहे. यामध्ये चांगले काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची कदर नक्कीच केली जाईल तर कानाडोळा करणाऱ्यांना शिक्षा मिळेल माजी गाठ पंचवीस वर्षासाठी आहे. असा सज्जड दम आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला आहे.

दि. २१ सप्टेंबर रोजी औसा येथे प्रशासकीय इमारतीत आयोजित पालकमंत्री पाणंद रस्ते, तांडे – वाडी विकास कामासंदर्भात व कृषी विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीत औसा – रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, निलंगा उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, औशाचे तहसीलदार शोभा पुजारी, निलंगा तहसीलदार गणेश जाधव, औशाचे नूतन तहसीलदार भरत सुर्यवंशी,जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ,सहाय्यक गटविकास अधिकारी निलंगा ए.बी.चव्हाण, औशाचे तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, निलंगा कृषी अधिकारी काळे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव आदीसह संबंधित विभागाचे कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी आदी उपस्थित होते.या बैठकीत आ. अभिमन्यू पवार बोलत होते की विकासापासून कायम दुर्लक्षित असलेले तांडे – वाडी यांच्या सुधारणेसाठी विकासाचा एक नियोजनबद्ध आराखडा तयार करणे आवश्यक आहे. हा आराखडा प्रशासनाने तयार करावा जेणेकरुन हा आराखडा केंद्रात भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाकडे पाठवून निधी उपलब्ध करण्याबाबत आपण पाठपुरावा करणार आहे.औसा तालुक्यात ३१ तांडे असून यामध्ये ५ तांडयांना महसूली तर २ तांडयांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा औसा विधानसभा मतदारसंघातील महसूली दर्जा आहे त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा देणे यासाठी मंत्रालयाकडे प्रयत्न करणार आहे व ज्या तांडयांना महसूली दर्जा मिळाला नाही त्यासाठी तो मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असून संबंधित कामासंदर्भात औसा व निलंगा येथील तहसीलदारांना प्रस्ताव तयार करण्याची सुचना या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रशासनाला दिली.

या बैठकीत तांडा – वाडी येथील शाळा, अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्यायामशाळा, वीजपुरवठा, रस्ते आदीची माहिती घेवून तांडा – वाडी येथील शेतकऱ्यांनी फळलागवड व शेततळे यासह मनरेगा योजनेसाठी पुढाकार घ्यावा.असे आवाहन त्यांनी केले. वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून देणे तांडा विकासाच्या दृष्टीने नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा या मागचा उद्देश होता.

यानंतर पालकमंत्री पाणंद रस्ते याबाबत आ. अभिमन्यू पवार यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत झालेल्या कामाची व प्रस्तावित कामाची माहिती घेत या पाच महिन्यांत मतदारसंघात ६४० किलोमीटर शेतरस्ते कामे पूर्ण झाली असून १ नोव्हेंबर पासून या कामाचा दुसरा टप्पा सुरू केला जाणार असल्याचे सांगून या टप्प्यात १ हजार किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते कामे केले जाणार आहेत. यासाठी निधी कमी पडू नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून इतर आमदार व खासदार यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. आमदार निधीतून शेतरस्ते हा महाराष्ट्राला दिशा देणारा औसा पॅटर्न या कामातून निर्माण होत आहे. हे अभियान आता चळवळ म्हणून उभी राहात असून मतदारसंघातील शेतकरी यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहे. तर मातीकाम झालेल्या गावांनी मजबुतीकरण कामांसाठी प्रस्ताव दाखल करावे आशा सुचना आ. अभिमन्यू पवार यांनी या बैठकीत देत शेतरस्ते अभियान शेवटच्या रस्त्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले यावेळी मतदारसंघातील कृषी विभागाच्या औसा व निलंगा विभागातील फळबाग लागवडीची माहिती घेत फळबाग लागवडीचा उद्दिष्ट कृषी विभागाने पुर्ण करण्याची सुचना या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाया म्हणून बघण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात प्रक्रिया उद्योगाकडे वळायचे आहे. असे आ. पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here